शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

शिक्षकांवर सूड उगवण्यासाठी अभिनेत्याने बुलडोझर फिरवून पाडली शाळेची इमारत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 17:31 IST

अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करुन शाळेची इमारत जमीनदोस्त केल्याची माहिती दिली आहे.

Viral News : आपल्याकडे एखाद्या वास्तूबाबत किंवा ठिकाणाबाबत नेहमीच चांगल्या-वाईट आठवणी असतात. अनेक वेळा या आठवणी आयुष्यभर आपल्याला आठवतात आणि त्या आपल्यासोबत राहतात. शाळा हेसुद्धा असंच ठिकाणं आहे ज्याच्या आठवणी कोणीही कधीच विसरणार नाही. शाळेत प्रत्येकाला चांगले वाईट दोन्ही अनुभव आलेले असतात. पण वय जसं वाढतं तसे हे अनुभव गाठीशी बांधून पुढे जात असतो. पण एका अभिनेत्याने शाळेची इमारत पाडून त्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकांचा बदला घेतला आहे, असे आम्ही तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का?

अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. अभिनेत्याने त्याच्यासोबत शाळेत घडलेली घटना एवढी मनावर घेतली की त्याने मोठं झाल्यानंतर ती शाळाच पाडून टाकली. अभिनेत्याने शाळेची जागा विकत घेतली आणि नुकतीच ती इमारत पाडली.  अभिनेत्याने इंस्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट करुन याची माहिती दिलीय.

अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवर शाळेच्या इमारतीच्या ढिगाऱ्याचे फोटो शेअर केले आहेत. "माझ्या प्राथमिक शाळेतील शिक्षक मला नेहमीच मारायचे. म्हणून हा राग मनात ठेवून मी आज ही शाळेची जागा विकत घेतली आणि या शाळेच्या इमारतीवर बुलडोझर फिरवला. एका विशिष्ट मानसिक स्थितीत मी हे कृत्य केलंय," असं या अभिनेत्यानं म्हटलं आहे.

काही वेळातच हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी अभिनेत्याच्या या कृतीवर टीका केली तर काहींनी त्याचे समर्थन केले. एका युजरने "एक कलाकार म्हणून तुमच्याबद्दलचा माझा आदर अमर्याद आहे, पण मला वाटते की सर जे झालं ते चांगले नाही.  तुमचे आणि तुमच्या शिक्षकांचे अनुभव वेगळे आहेत, पण तुम्ही शाळा आणि सर्व काही उद्ध्वस्त केले, ते चांगले नव्हते," असं म्हटलं आहे.

आणखी एका युजने, "ज्या पिढीला त्यांच्या प्राथमिक शाळेत असताना मारहाण झाली ती पिढी यशस्वी आहे आणि वरिष्ठांचा आदर करते, असं म्हटलं आहे. दुसरीकडे अनेकांनी या कृतीचे समर्थन केले. "तुम्ही माझे स्वप्न जगत आहात. तुम्हाला अधिक शक्ती मिळो, असे एकाने म्हटलं आहे. दुसऱ्या नेटकऱ्याने, मी खरंतर त्याचे समर्थन करतो कारण मला माहित आहे की लहान मुलांवर आघात कसा होतो. मला माझ्या शाळेमध्येही असेच करायचे आहे कारण बरेच शिक्षक वाईट होते," असं म्हटलं आहे.

कोण आहे हा अभिनेता?

तर शाळेची इमारत पाडणारा हा तुर्की अभिनेता कॅग्लर एर्तुग्रल आहे.२००२० मध्ये ‘अफिल आस्क’मधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन बटरफ्लाय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय इतर काही मालिका आणि चित्रपटांत त्याने भूमिका केल्या आहेत. 

 

 

टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Instagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडिया