Australia Bondi Beach Sydney Shooting: ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील बोंडी समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या घटनेने संपूर्ण जग हादरले. ज्यू समुदायातील लोक हनुक्का सणानिमित्त रात्रीच्या वेळेस उत्सव साजरा करत होते. त्यावेळी त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला. हनुक्का उत्सव या वर्षी १४ डिसेंबरपासून सुरू झाला. २२ डिसेंबरपर्यंत हा उत्सव सुरु राहणार आहे. या उत्सवानिमित्त हजारो ज्यू लोक समुद्र किनारी जमले होते. या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच काही लोक गोळीबारात गंभीर जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहे.
"ऑस्ट्रेलियातील बाँडी बीचवर ज्यूं लोकांच्या हनुक्का सणाच्या पहिल्या दिवशी उत्सव साजरा करणाऱ्या लोकांना लक्ष्य करून झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. भारताच्या जनतेच्या वतीने, ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याबद्दल मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. दुःखाच्या या प्रसंगी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या जनतेसोबत खंबीरपणे उभे आहोत. भारताचे दहशतवादाबद्दल शून्य सहनशीलतेचे धोरण आहे आणि आम्ही दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्धच्या लढ्याला पाठिंबा देतो," असे रोखठोक मत मोदी यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या गोळीबारादरम्यान, एका व्यक्तीने धाडसाने मृत्यूला हुलकावणी देत हल्लेखोराला पकडले आणि त्याच्यावर रायफल ताणली. गोळीबार सुरू असताना आणि पोलीस पोहचण्यापूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यात आरोपी गोळीबार करताना दिसत आहे. सगळीकडे धावपळ सुरू झाली. लोक जीव मुठीत घेऊन पळत होते. अशातच एक व्यक्ती गोळीबार करणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने धावत जाताना दिसत आहे. पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती कारच्या आडोशाने हळहळू गोळीबार करणाऱ्या व्यक्तीपर्यंत जातो आणि त्याला काही कळायच्या आत पाठीमागून पकडतो. दोघांमध्ये झटापट सुरू होते. तेव्हा व्यक्ती त्याच्या हातातील रायफल हिसकावतो आणि त्याला निरुत्तर करतो.
Web Summary : PM Modi condemned the Sydney shooting at Bondi Beach during a Jewish festival as a terror attack on humanity. He expressed condolences and affirmed India's support for Australia, emphasizing zero tolerance for terrorism.
Web Summary : पीएम मोदी ने सिडनी के बॉन्डी बीच पर यहूदी त्योहार के दौरान हुई गोलीबारी को मानवता पर आतंकी हमला बताया। उन्होंने संवेदना व्यक्त की और आतंकवाद के प्रति शून्य सहिष्णुता पर जोर देते हुए ऑस्ट्रेलिया के लिए भारत के समर्थन की पुष्टि की।