शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून त्यांनी देशाचं नाव बदललं... आफ्रिकेतील पूर्ण राजेशाही असणारा शेवटचा देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 12:44 IST

स्वातंत्र्यानंतर ऱ्होडेशियाचे झिम्बाब्वे, न्यासालँडचे मालावी आणि बेशुनालँडचे बोटस्वाना अशी नावे बदलण्यात आली होती. आफ्रिकेतील हा लहानसा देश. स्वातंत्र्य मिळवून पन्नास वर्षे झाली, आफ्रिका खंडात या एकमेव देशात पूर्ण राजेशाही राजवट आजही आहे. आता स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी देशाचं नावच बदलायचं ठरवलं आहे. हा देश आहे......

ठळक मुद्देमस्वाती यांनी वयाच्या 18 व्या वर्षी 1986 साली स्वाझीलँडचा राज्यकारभार हाती घेतला त्यांच्या अत्यंत  ऐशोरामीच्या जीवनशैलीवर जगभरातून नेहमीच टीका होत असते. मस्वाती (तिसरे) यांचे वडिल शोभुजा (दुसरे) यांनी स्वाझीलँडचे राजेपद 82 वर्षे भूषविले होते.

स्वाझीलँड- आफ्रिकेतील हा लहानसा देश. स्वातंत्र्य मिळवून पन्नास वर्षे झाली, आफ्रिका खंडात या एकमेव देशात पूर्ण राजेशाही राजवट आजही आहे. आता स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी देशाचं नावच बदलायचं ठरवलं आहे. हा देश आहे स्वाझीलँड. या देशाचे राजे मस्वती (तिसरे) यांनी परदेशी पाहुण्यांची स्विर्त्झलँड आणि स्वाझीलँड या नावात गल्लत होऊ नये म्हणून आपण हा बदल करत असल्याचे जाहीर केले आहे.

स्वाझीलँडचं नाव आता इस्वातिनी असे करण्यात आले आहे. युरोपीय देशांकडून स्वातंत्र्य मिळवल्यावर आफ्रिकेतील देशांनी आपली मूळ नावे पुन्हा धारण केली होती मात्र स्वाझी लोकांचा प्रदेश म्हणून स्वाझीलँड असे ब्रिटिशांनी ठेवलेले नाव कायम राहिले होते. स्वातंत्र्यानंतर ऱ्होडेशियाचे झिम्बाब्वे, न्यासालँडचे मालावी आणि बेशुनालँडचे बोटस्वाना अशी नावे बदलण्यात आली होती.

आम्ही पुन्हा जुने मूळ नाव धारण केल्याची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे असे राजे मस्वती यांनी सांगितले. स्वाझीलँडमधील स्वाझी आणि इंग्लिश अशी सरमिसळ काही नागरिकांना आवडत नव्हती. 2015 पासूनच हे नाव बदलण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. राजे मस्वाती यांनी याआधीच आपल्या भाषणांमध्ये हे नाव वापरण्यास सुरुवात केली होती. मस्वाती यांनी वयाच्या 18 व्या वर्षी 1986 साली स्वाझीलँडचा राज्यकारभार हाती घेतला त्यांच्या अत्यंत  ऐशोरामीच्या जीवनशैलीवर जगभरातून नेहमीच टीका होत असते. मस्वाती (तिसरे) यांचे वडिल शोभुजा (दुसरे) यांनी स्वाझीलँडचे राजेपद 82 वर्षे भूषविले होते. शोभुजा (दुसरे) यांनी 125 विवाह केले होते असे त्यांचे चरित्रकारांनी लिहून ठेवले आहे तर मस्वाती यांचे 15 विवाह झाल्याचे सांगण्यात येते.

सध्या या देशाच्या राज्यघटनेत 200 वेळा देशाचे नाव स्वाझीलँड असे नमूद करण्यात आले आहे तसेच स्वाझीलँडच्या सरकारी विमानकंपनीचे नाव स्वाझीलँड एअरलिंक असे आहे, सर्व चलनावर म्हणजे नोटा-नाण्यांवरही स्वाझीलँड असेच नाव आहे आणि मध्यवर्ती बँकेचे नावही सेंट्रल बँक ऑफ स्वाझीलँड असे आहे. या सर्व ठिकाणी स्वाझीलँडचे नाव बदलावे लागणार आहे. सर्व सरकारी संकेतस्थळांवरही नाव बदलण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र संयुक्त राष्ट्रे आणि राष्ट्रकूलमध्येही इस्वातिनी असे नाव करण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय