शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:52 IST

इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेहरानमधील भारतीय दूतावासाने नवीन सुरक्षा अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. भारतीयांना त्वरित देश सोडण्याचे आदेश दिले असून महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच, आता भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने बुधवारी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची सुरक्षा अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीयांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.

'त्वरीत देश सोडा', दूतावासाचा स्पष्ट इशारा

भारतीय दूतावासाने आपल्या नव्या पत्रकात म्हटले आहे की, "इराणमधील सद्यस्थिती आणि अलीकडील घडामोडी पाहता, सर्व भारतीय नागरिकांनी दूतावासाने सुचवलेल्या सुरक्षित मार्गांचा वापर करून लवकरात लवकर इराण सोडावे." विशेष म्हणजे, कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीमेकडे जाण्यापूर्वी दूतावासाचा सल्ला घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. परस्पर कोणताही निर्णय घेऊन सीमेवर जाण्याचा प्रयत्न करू नका, असेही दूतावासाने स्पष्ट केले आहे.

पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

यापूर्वी दूतावासाने भारतीयांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. "पुढील ४८ तास भारतीयांनी जिथे आहात तिथेच सुरक्षित राहावे. विजेची उपकरणे, लष्करी तळ आणि बहुमजली इमारतींच्या वरच्या मजल्यांपासून दूर राहा," असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, आता परिस्थिती बदलत असल्याने थेट देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. कोणत्याही महामार्गावर प्रवास करायचा असल्यास दूतावासाच्या निर्देशांशिवाय तो करू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.

ट्रम्प यांची डेडलाईन आणि युद्धबंदीची घोषणा

एकीकडे भारतीय दूतावास अलर्ट मोडवर असताना, दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांच्या युद्धबंदीची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या मध्यस्थीनंतर ट्रम्प यांनी इराणवरील विनाशकारी कारवाई तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, होर्मुजची सामुद्रधुनी सुरक्षित ठेवण्याच्या अटीवरच ही स्थगिती देण्यात आली आहे.

भारतीयांसाठी हेल्पलाइन जारी

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी दूतावासाने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. समन्वय साधण्यासाठी भारतीय अधिकारी २४ तास संपर्कात असून, नागरिकांनी घाबरून न जाता दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Tensions: India Urges Citizens to Evacuate Immediately Amidst War Fears

Web Summary : Amidst heightened US-Iran tensions, India urgently advises its citizens in Iran to evacuate using safe routes suggested by the embassy. This follows earlier warnings to stay indoors. A temporary ceasefire brokered by Pakistan offers a small window, but vigilance is key.
टॅग्स :IranइराणIndiaभारतWarयुद्धUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर