शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

आश्चर्य.. रोबोटने वाचवले कपाटाखाली सापडणाऱ्या मुलीला

By admin | Published: July 06, 2017 8:01 PM

वस्तू काढण्यासाठी चढलेल्या मुलीवर कोसळणारे कपाट पकडून एका रशियन रोबोटने तिचा जीव वाचवण्याची आश्चर्यकारक घटना रशियात घडली आहे.

ऑनलाइन लोकमत
सेंट्रल रशिया, दि. 6-  वस्तू काढण्यासाठी चढलेल्या मुलीवर कोसळणारे कपाट पकडून एका रशियन रोबोटने तिचा जीव वाचवण्याची आश्चर्यकारक घटना रशियात घडली आहे. पर्म पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीने जाहीर केलेल्या चित्रफितीमध्ये प्रोमोबोट नावाचा रशियन बनावटीचा रोबोट कपाटाखाली चिरडण्यापासून एका मुलीला वाचवल्याचे दिसत आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार कपाटातील वस्तू काढण्यासाठी त्यावर चढणाऱ्या मुलीवर वस्तू कोसळत असताना कपाटही तिच्यावर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावेळेस रोबोटने स्वतःहून पुढे जात कपाटाला धरले आणि मुलीचा जीव वाचवला. या रोबोटचा निर्माता ओल्गेव किवोकुर्टस्केव्ह याने रोबोटने कोणत्याही आज्ञेविना पुढे जात मुलीचा जीव वाचवला असा दावा केला आहे.
 
एका लॉबीमध्ये रोबोटच्या समोर असलेल्या कपाटाजवळ एक मुलगी स्वतः चालत येत असल्याचे व्हीडिओत दिसते. त्यानंतर ही मुलगी वस्तू  काढण्यासाठी कपाटावर चढताना दिसते. तिच्या वजनामुळे कपाट पुढे येऊन त्यातील वस्तू खाली पडताना दिसतात. एका क्षणी कपाट त्या मुलीच्या अंगावर पडण्याची शक्यता निर्माण होताच हा रोबोट स्वतः पुढे येऊन ते कपाट एका हाताने रोखून दिसताना व्हीडिओत दिसतो. काही तज्ज्ञांच्या मते हे मिरर मोडमुळे झाले असावे. जेव्हा मुलीने तेथे प्रवेश केला तेव्हा रोबोटही कपाटाच्या दिशेने सरकतो. जेव्हा ती हात वर करून कपाटावर चढू लागते तेव्हा त्याचेही हात वर जातात त्यामुळे हा सगळा केवळ योगायोग असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. तर रोबोटने मुलीला वाचवण्याचा प्रकार स्वतःहून केल्याचा दावा काही तंत्रज्ञान विषयात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी खोटा ठरवला आहे.
 
प्रोमोबोटचा निर्माता ओल्गेवने मात्र रोबोटच्या या कृतीवर आनंद व्यक्त केला आहे. कपाट कोसळण्याच्या वेळेस रोबोट तेथे होता ही चांगली बाब असल्याचे सांगत आम्ही लोकांचे जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी प्रयत्न करतो असेही ओल्गेवने सांगितले आहे.
 
रात्रीही काढा क्वालिटी फोटो, व्हॉट्सअॅपचं जबरदस्त फीचर
 
वाहतुकीचे नियम पाळण्याचा पोलिसांनी शिकवला धडा, फेसबुकवर फोटो केला पोस्ट

 

(व्हिडिओ साभार - यूट्युब)