शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

पुन्हा सर्जिकल स्ट्राइक?; म्हणून पाकिस्तानींना सतावतेय भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 07:16 IST

पाकचे माजी उच्चायुक्त बासीत यांचा दावा, पूंछमधील हल्ल्यानंतर शक्यता वाढली

इस्लामाबाद : भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करू शकतो, अशी पाकिस्तानच्या मनात भीती आहे. तसे वक्तव्य पाकिस्तानचेभारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी केले आहे. २० एप्रिलला पूंछमध्ये भारतीय जवानांवर हल्ला झाला. त्यानंतर पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइकच्या भीतीने पुन्हा डोके वर काढले आहे, असे बासीत यांनी सांगितले.

बासीत यांनी यूट्यूब चॅनलवर टाकलेल्या व्हिडीओत हा मुद्दा मांडला. ‘एससीओ’च्या बैठकीसाठी पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो भारतात येणार आहेत. त्यापूर्वी बासीत यांनी हे वक्तव्य केले. 

२९ सप्टेंबर २०१६ उरी येथे दहशतवाद्यांनी लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात ११ भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने सीमा ओलांडून पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून ५० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले.

२६ फेब्रुवारी २०१९ पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४६ जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने सर्जिकल स्ट्राइक करून बालाकोट येथील दहशतवादी तळ नष्ट करून ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला हाेता.

पाकिस्तानच्या कुरापती सुरूचपाकने गेल्या सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या बैठकीतही काश्मीर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, त्या कांगाव्यालाही भारताने खणखणीत उत्तर दिले होते.  ३७० कलम, तसेच जम्मू- काश्मीरला असलेला विशेष दर्जाही केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्दबातल केला होता. त्याला पाकिस्तानने विरोध केला होता. यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढला. 

जम्मू-काश्मीर, लडाख आमचाच अविभाज्य भाग : भारतn काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारताने खडसावले. n कितीही कांगावा केला तरी जम्मू-काश्मीर, लडाख हा आमचाच अविभाज्य भाग आहे व यापुढेही राहील, असे भारताने बजावले आहे. n पाकचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरूपी प्रतिनिधी मुनीर अक्रम यांनी काश्मीर प्रश्नाचा उल्लेख केला होता. n त्यास भारताचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरूपी प्रतिनिधी प्रतीक माथूर यांनी चोख प्रत्युत्तर दिले. 

पाकिस्तानने काश्मीरबद्दल कितीही कांगावा, तसेच अपप्रचार केला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. जम्मू- काश्मीर, लडाख हे भारताचाच अविभाज्य भाग आहेत.     - प्रतीक माथूर 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतTerror Attackदहशतवादी हल्ला