शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सुनिता विल्यम्स चालायला विसरल्या; 7 महिन्यांपासून पृथ्वीवर परतण्यासाठी करताहेत धडपड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 17:09 IST

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स जून 2024 पासून अंतराळात अडकल्या आहेत. यानातील तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या परतीचा मार्ग खडतर बनला आहे.

Sunita Williams : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स जून 2024 पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकल्या आहेत. अवघ्या महिन्याभरासाठी अंतराळात गेलेल्या सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे परतीला विलंब होत आहे. दरम्यान, आता सुनिता यांच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. सात महिन्यांपासून झिरो गुरुत्वाकर्षण कक्षेत राहिल्यामुळे सुनिता चालणे विसरल्या आहेत.

सुनीता विल्यम्स चालणे विसरल्या27 जानेवारी रोजी त्यांनी नीडहॅम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी अंतराळातून संवाद साधला आणि त्यांना स्पेस स्टेशनमधील परिस्थितीची माहिती दिली. यावेळी सुनित्या म्हणाल्या, 'मी या शुन्य गुरुत्वाकर्षण ठिकाणी खूप दिवसांपासून आहे, त्यामुळे चालणे काय असते, हे मी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. इथे मला चालता येत नाही, बसता येत नाही, झोपताही येत नाही. इथे फक्त आम्ही तरंगतोत. माझा सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांनाही अंतराळात अडकून राहावे लागेल, याची अपेक्षा नव्हती. त्याच्यासाठी हे थोडे धक्कादायक आहे. खरं सांगायचे तर, आम्हाला माहित होते की, साधारण एक महिना लागेल, पण त्यापेक्षा जास्त काळ अंतराळात राहणे कठीण आहे.'

सुनिता आणि बुच सात महिन्यांपासून अंतराळात अडकले सुनिता विल्यम्स(61) आणि बुच विल्मोर(59) एका महिन्याच्या मिशनसाठी अंतराळात गेले होते, पण त्यांच्या यानामध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानंतर त्यांना तिथेच अडकून राहावे लागले. आता दोघेही मार्चनंतर पृथ्वीवर परतण्याची अपेक्षा आहे. यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्या SpaceX ची मदत घेतली आहे. सोबत सहकार्य करत आहे. या दोघांना परत आणण्यासाठी SpaceX चे यान पाठवले जाणार आहे.

अंतराळात दीर्घकाळ राहण्याचे परिणामसुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना मुळात अवघ्या एका महिन्याच्या मोहिमेवर पाठवण्यात आले होते, परंतु तांत्रिक कारणांमुळे त्यांची मोहीम 7 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली. या अनपेक्षित विस्ताराने त्यांना  शून्य गुरुत्वाकर्षणात राहावे लागत आहे. याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने स्नायू आणि हाडे कमकुवत होणे, दृष्टी जाणे आणि शरीराचे संतुलन बदलणे, यासारख्या समस्या उद्भवू शकतात. सुनिताची चालण्याची धडपड, हे या परिणामांचे उदाहरण आहे. यामुळे मंगळासारख्या दीर्घ मोहिमेसाठी मानवी शरीर तयार आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमध्ये बिघाडसुनिता आणि बुच यांना स्टारलाइनर अंतराळयानातून आयएसएसवर पाठविण्यात आले होते, परंतु यानात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या परत येण्यास विलंब झाला. दोघांची सुरक्षितता लक्षात घेता नासाने, त्यांना ISS वर थांबवण्याचा निर्णय घेतला. आता SpaceX च्या क्रू-10 मिशनचे अंतराळवीर मार्च किंवा एप्रिलमध्ये सुनिता आणि बुच यांना आणण्यासाठी जाणार आहे. 

टॅग्स :NASAनासाAmericaअमेरिकाelon muskएलन रीव्ह मस्क