पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स

By Admin | Updated: September 8, 2016 05:06 IST2016-09-08T05:06:15+5:302016-09-08T05:06:15+5:30

भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त गौतम बंबावाले यांचा कराचीतील मंगळवारचा कार्यक्रम आयत्या वेळेत रद्द करण्यास पाकिस्तान सरकारने भाग पाडल्यामुळे भारताने तीव्र

Summons to Pakistan High Commissioner | पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स

पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स

कराची/नवी दिल्ली : भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त गौतम बंबावाले यांचा कराचीतील मंगळवारचा कार्यक्रम आयत्या वेळेत रद्द करण्यास पाकिस्तान सरकारने भाग पाडल्यामुळे भारताने तीव्र
नापसंती व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे दिल्लीतील उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून भारताने ही नापसंती व्यक्त केली.
गौतम बंबावाले यांनी काल कराचीतील एका कार्यक्रमात बोलताना भारताच्या, काश्मीरच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगड फेकू नये, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांचा नंतरचा कार्यक्रम रद्द करण्यास पाकिस्तान सरकारने भाग पाडले. भारतीय उच्चायुक्तांच्या स्वातंत्र्यावर अशा प्रकारे निर्बंध आणण्याच्या प्रकाराचा आपण निषेध करतो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विकास स्वरूप यांनी अब्दुल बसीत यांना सुनावले. (वृत्तसंस्था)

Web Title: Summons to Pakistan High Commissioner