अफगाणिस्तानात आत्मघाती स्फोट
By Admin | Updated: April 3, 2015 00:11 IST2015-04-03T00:01:20+5:302015-04-03T00:11:44+5:30
अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात आत्मघाती हल्लेखोराने गुरुवारी घडवून आणलेल्या स्फोटात १३ ठार, तर ४० जण जखमी झाले.

अफगाणिस्तानात आत्मघाती स्फोट
काबूल : अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात आत्मघाती हल्लेखोराने गुरुवारी घडवून आणलेल्या स्फोटात १३ ठार, तर ४० जण जखमी झाले. गव्हर्नरांच्या निवासस्थानासमोर भ्रष्टाचारविरोधी निदर्शने सुरू असताना हा हल्ला झाला. जखमींत एका प्रमुख संसद सदस्याचा समावेश आहे.
१३ मृतदेह व ३९ जखमी लोकांना रुग्णालयात आणण्यात आले आहे, असे खोस्त शहरातील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अमीनुल्लाह खान यांनी सांगितले; मात्र स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने २० ठार, तर ४० जण जखमी झाल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)