काबुलमध्ये लष्करी बसवर आत्मघातकी हल्ला
By Admin | Updated: June 20, 2016 09:11 IST2016-06-20T08:29:03+5:302016-06-20T09:11:40+5:30
पूर्व काबूलमध्ये लष्करी बसवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. पुल-ए-चरखी परिसरात हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे

काबुलमध्ये लष्करी बसवर आत्मघातकी हल्ला
>ऑनलाइन लोकमत -
काबूल, दि. 20 - पूर्व काबूलमध्ये लष्करी बसवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. पुल-ए-चरखी परिसरात हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. हल्ल्यात काही लोक जखमी झाले असून काहींचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. हल्ला झाला तेव्हा बसमध्ये नेमकं कोण होतं याची माहिती मिळू शकलेली नाही.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार बसमधून सरकारी कर्मचारी प्रवास करत होते. त्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचवण्यासाठी बस जात असताना हा हल्ला करण्यात आला आहे. तर काहीजण बसमध्ये नेपाळी सुरक्षा कंत्राटदार होते असं सांगत आहेत.
हल्ल्याची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहे. हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला झाला असून दोन जखमींना रुग्णालयात घेऊन गेले असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणण आहे. हल्ल्याच नेमकं कारण कळू शकलेलं नाही.