शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेमध्ये घुसून गोळाबार केला अन् नंतर बॉम्बने स्वतःला उडवून दिले; सीरियात २२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:44 IST

सीरियातील चर्चमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू झाला.

Syria Church Attack: जगात युद्धाचे सावट असताना सीरियाची राजधानी दमास्कसमधील एका चर्चमध्ये आत्मघाती हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला तर ६३ जण जखमी झाले. सीरियाच्या गृहमंत्रालयाने या हल्ल्यासाठी इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाला जबाबदार धरले आहे. रविवारच्या दिवशी ग्रीक ऑर्थोडॉक्स सेंट एलियास चर्चेमध्ये प्रार्थना करत असताना हा हल्ला झाला. इस्लामिक स्टेटशी संबंधित एका दहशतवाद्याने चर्चमध्ये प्रवेश करत गोळीबार केला आणि नंतर स्वतःला उडवून दिले.

चर्चेमध्ये झालेला हा हल्ला राजधानीच्या मध्यभागी झाला, जो सीरियन राजवटीचा सर्वात सुरक्षित भाग मानला जातो. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री हा हल्ला झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरासोबत आणकी एक बंदूक घेतलेला व्यक्ती होता. त्याने गर्दीवर गोळीबार केला. त्यावेळी चर्चमध्ये सुमारे १५० ते ३५० लोक उपस्थित होते. स्फोट इतका भीषण होता की चर्चेमध्ये बसवलेले बेंच तुटले. "राजधानी दमास्कसमधील ड्वेला भागातील सेंट इलियास चर्चमध्ये एका आत्मघातकी हल्लेखोराने प्रवेश केला, जो आयसिस दहशतवादी गटाशी संबंधित होता. तिथे त्याने गोळीबार केला आणि नंतर स्फोटकांनी स्वतःला उडवून दिले," असं सीरियाच्या गृहमंत्रालयाने म्हटलं.

मात्र अद्यापही आयएसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या स्फोटांमध्ये जखमीं झालेल्यांमध्ये लहान मुले देखील आहेत. स्फोटानंतर लगेचच सुरक्षा कर्मचारी आणि आपत्कालीन बचाव यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. सीरियाचे सुरक्षा दल हल्ल्याचा तपास करत आहेत आणि चर्च परिसराचा भाग ताब्यात घेण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही काळात सीरियामध्ये झालेला हा एक मोठा हल्ला आहे. सीरिया अल्पसंख्याक समुदायांशी संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतानाच हा हल्ला झाला. सीरियाचे अध्यक्ष अहमद अल-शारा यांनी डिसेंबर २०२४ मध्ये माजी सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांना पदच्युत केले आणि त्यांच्या जागी इस्लामिक सरकार स्थापन केले. दुसरीकडे, असदच्या पतनानंतर आयएस गट स्वतःला पुन्हा संघटित करण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :SyriaसीरियाISISइसिसterroristदहशतवादी