शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

व्यापारावर ‘सुवेझ’चे संकट, आफ्रिकेमार्गे जहाजे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 8:40 AM

Suez crisis over trade : इजिप्तच्या सुवेझ कालव्यात अडकलेले ‘एव्हर गिव्हन’ हे अजस्र जहाज काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाचव्या दिवशीही यश मिळाले नाही. जहाज हटविण्यासाठी किती दिवस लागू शकतात, याबाबत सांगू शकत नाही, असे कालवा प्राधिकारणाचे प्रमुख ओसामा राबेई स्पष्ट केले.

कैराे : इजिप्तच्या सुवेझ कालव्यात अडकलेले ‘एव्हर गिव्हन’ हे अजस्र जहाज काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाचव्या दिवशीही यश मिळाले नाही. जहाज हटविण्यासाठी किती दिवस लागू शकतात, याबाबत सांगू शकत नाही, असे कालवा प्राधिकारणाचे प्रमुख ओसामा राबेई स्पष्ट केले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर सुवेझचे संकट आणखी काही दिवस राहणार असून, काही कंपन्यांनी आफ्रिकेच्या पर्यायी मार्गाने जहाजे वळविण्यास सुरुवात केली आहे. या संकटाचा जास्त परिणाम हाेऊ नये, यासाठी भारताने चतु:सूत्री उपाययाेजनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. 

जपानच्या कंपनीचे ‘एव्हर गिव्हन’ हे जहाज चीनहून नेदरलँडमधील राॅटरडॅम बंदरावर जात असताना मंगळवारी सुवेझ कालव्यात तिरपे हाेऊन अडकले. त्यामुळे कालव्यातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. पाच दिवसांपासून ते हटविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र,  त्यास किती दिवस लागतील, हे सांगता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, हाॅलंड आणि इटलीच्या दाेन टग बाेटी लाल समुद्राच्या मार्गे मदतीसाठी दाखल झाल्या आहेत.  भारताची उपाययाेजनाआफ्रिकेमार्गे जहाजे वळविण्याचा पर्याय खुला आहे. नाशवंत वस्तूंच्या मालवाहतुकीला प्राधान्य देण्यात येईल, तसेच जेएनपीटी, मुंद्रा आणि हाजिरा बंदरांवरही काेंडी हाेऊ शकते. त्याबाबतही नियाेजन करण्यात येईल. याबाबत केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली हाेती. 

व्यापारावर परिणामदरराेज सुमारे १०० जहाजे या मार्गाचा वापर करतात. मात्र, मार्ग बंद झाल्यामुळे तासाला २८०० काेटी रुपयांचा व्यापार ठप्प पडला आहे. आठवडाभरात सरासरी ९.७ अब्ज डाॅलर्सची मालवाहतूक ठप्प झाली आहे.  कच्च्या तेलाचा पुरवठा करणारी ३० हून अधिक जहाजे अडकल्यामुळे इंधन तुटवडाही हाेण्याची भीती आहे.   

अमेरिकेचा मदतीचा प्रस्ताव : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्याे बायडेन यांनी सुवेझचा तिढा साेडविण्यासाठी मदतीचा प्रस्ताव दिला आहे. अमेरिकेकडे जहाज माेकळे करण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि तांत्रिक क्षमता असल्याचे बायडेन यांनी सांगितले.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय