शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सुदानमध्ये लष्कराचे विमान कोसळले; आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:32 IST

Sudanese Military Aircraft Crashed: सुदान 2023 पासून गृहयुद्धाच्या गर्तेत आहे.

Sudanese Military Aircraft Crashed: गृहयुद्धाच्या आगीत होरपळणाऱ्या सुदान देशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील ओमदुरमन शहरात लष्कराचे विमान कोसळले, ज्यात 46 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी आहेत. लष्कर आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी बुधवारी (26 फेब्रुवारी) या घटनेची माहिती दिली. या अपघातात अनेक लष्करी जवान आणि नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

सुदानच्या लष्कराच्या अहवालानुसार, लष्कराचे अँटोनोव्ह विमान मंगळवारी (24 फेब्रुवारी) वाडी सय्यदना एअरबेसवरून उड्डाण घेत असताना क्रॅश झाले. या अपघातामागील मुख्य कारणाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

2 वर्षांपासून गृहयुद्धाची परिस्थितीसुदान 2023 पासून गृहयुद्धाच्या गर्तेत आहे. येथे लष्कर आणि कुख्यात निमलष्करी गट रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) यांच्यातील तणावामुळे युद्ध पेटले आहे. हा संघर्ष शहरी भागात, विशेषत: दारफुर प्रदेशात विनाशकारी बनला असून, वांशिक हिंसाचार आणि सामूहिक बलात्कार यांसारख्या भयानक घटना घडत आहेत. संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय अधिकार संघटनांनी या घटनांना मानवतेविरोधातील गंभी गुन्हे आणि युद्ध गुन्हे म्हणून संबोधले आहे.

परिस्थिती सतत बिघडत चालली आहेअलिकडच्या काही महिन्यांत लष्कराने खार्तूम आणि इतर भागात आरएसएफविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. अशा घटनांमुळे सुदानचे संकट आणखी गुंतागुंतीचे होत आहे आणि त्यामुळे नागरी सुरक्षा आणि शांततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातairplaneविमानCrime Newsगुन्हेगारी