जोहान्सबर्गमध्ये आंदोलक विद्यार्थी व पोलिसांत संघर्ष
By Admin | Updated: September 21, 2016 08:12 IST2016-09-21T06:48:56+5:302016-09-21T08:12:39+5:30
तीन आठवड्यांपासून मुक्त शिक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने मंगळवारी हिंसक वळण घेतले.

जोहान्सबर्गमध्ये आंदोलक विद्यार्थी व पोलिसांत संघर्ष
ऑनलाइन लोकमत
जोहान्सबर्ग, दि. 21 - दक्षिण आफ्रिकेत गत तीन आठवड्यांपासून मुक्त शिक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने मंगळवारी हिंसक वळण घेतले. वीटवॉटरॉन्ड विद्यापीठ परिसरात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष उडाला. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करुन विद्यार्थ्यांच्या जमावाला नियंत्रणात आणले आणि ३१ आंदोलनकर्त्याना अटक केली. १९९४ मध्ये अल्पसंख्याक श्वेतवर्णीयांची सत्ता संपुष्टात आल्यानंतरही गत दोन दशकांत असमानतेची वागणूक मिळत असल्यामुळे कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांमध्ये चीड निर्माण झाली व त्यातून हा उद्रेक झाला.