शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

पीओकेवरून तणाव; पाकिस्तानची एफ १६, मिराज लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 15:54 IST

पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्‍तान आणि मुजफ्फराबादवर अवैधरित्या ताबा मिळविला आहे. मंगळवारी आयएमडीने या भागाचा समावेश अनुमानामध्ये केला आहे. या अनुमानामध्ये गिलगिट-बाल्टिस्‍तान आणि मुजफ्फराबादचा उल्लेख करणे भारताचे मोठे पाऊल मानले जात आहे. भारताने या भागावर पाकिस्तानला कोणताही हक्क नसल्याचे म्हटले होते.

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यातच पाकिस्तानला गिलगिट-बाल्टिस्तान तत्काळ खाली करण्याचा इशारा दिला होता. पाकिस्तानला तिथे अनधिकृतरित्या ताबा घेतल्याचे सुनावले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी भारतीय हवामान विभागाने जम्‍मू-काश्‍मीरच्या सब डिव्हीजनला आता जम्‍मू आणि कश्‍मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्‍तान आणि मुजफ्फराबाद म्हणण्यास सुरुवात केली आहे. यावरून पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली असून एलओसीवर तणाव वाढू लागला आहे. 

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर अचानक लढाऊ विमानांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी सीमेममध्ये एफ-16, जेएफ-17 आणि मिराज III ही लढाऊ विमाने अचानक उड्डाण घेऊ लागली आहेत. याबाबतचे वृत्त आज तकने दिले आहे. पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्‍तान आणि मुजफ्फराबादवर अवैधरित्या ताबा मिळविला आहे. मंगळवारी आयएमडीने या भागाचा समावेश अनुमानामध्ये केला आहे. या अनुमानामध्ये गिलगिट-बाल्टिस्‍तान आणि मुजफ्फराबादचा उल्लेख करणे भारताचे मोठे पाऊल मानले जात आहे. भारताने या भागावर पाकिस्तानला कोणताही हक्क नसल्याचे म्हटले होते. पाकिस्तानी न्यायालयाने या ठिकाणी निवडणूक घेण्याचा निर्णय दिला होता. यानंतर भारताने पाकिस्तानी उच्चायुक्तांना बोलावून सुनावले होते. यानंतर पाकिस्तानने सीमेवर गोळीबार सुरु केला होता. 

सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात हंदवाडामध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह पाच जवान शहीद झाले होते. यामुळे पाकिस्तान घाबरलेला आहे. भारताकडून हवाई हल्ला किंवा सर्जिकल स्ट्राईकसारखी कारवाई होण्याच्या भीतीने लढाऊ विमानांची हालचाल वाढविण्यात आली आहे. 

भारतीय सीमारेषेजवळून पाकिस्तानची एफ-16, जेएफ-17 आणि मिराज III लढाऊ विमाने झेपावू लागली आहेत. पाकिस्तानच्या या हालचालींमुळे भारतीय सैन्यही सतर्क झाले असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच भारतीय हवाई दलालाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानी विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी भारत Airborne Warning And Control System (AWACS) चा वापर करत आहे. 

गेल्या वर्षी पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत झालेल्या झटापटीत भारतीय हवाईदलाने पाकिस्तानचे एफ१६ विमान पाडले होते. यानंतर पाकिस्तानने हवाई हद्द बंद केली होती. हे विमान पाडताना भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने ते पाकिस्तानच्या ताब्यात गेले होते. मात्र, मुत्सद्देगिरी करत त्यांना परत भारतात आणण्यात आले होते. 

महत्वाच्या बातम्या...

Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी

पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडणार?; भारतीय हवामान विभागाचा इशारा

रहस्यमय...! भारतातील शेवटचे गाव; जिथे आजही महाभारतातील पूल अस्तित्वात

टॅग्स :POK - pak occupied kashmirपीओकेPakistanपाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दलTerror Attackदहशतवादी हल्ला