शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विचित्र अपघात; रनवेवर उतरताना विमानाचे तीन तुकडे झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 08:44 IST

अपघातानंतर विमानतळ बंद करण्यात आला असून अन्य विमानांना दुसरीकडे वळविण्यात आले आहे.

इस्तंबुल : तुर्कस्तानच्या इस्तंबुलमध्ये एक प्रवासी विमान विमातळावर उतरताना घसरले. यावेळी या विमानाचे तीन तुकडे झाले. यावेळी विमानाच्या मागील भागात आग लागली. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 150 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. बोईंगचे 737 हे विमान जोरदार वारा आणि पावसामध्ये लँडिंगचा प्रयत्न करत होते. 

विमानामध्ये 171 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर होते. विमानाने इजमिर शहरातून उड्डाण केले होते. इस्तंबुलच्या सबिहा गोजेन विमानतळावर उतरत असताना हा अपघात झाला. विमानाने पेट घेतल्यानंतर लगेचच आपत्कालीन टीमने ती विझविली. तसेच आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. घटनेनंतर आलेल्या फोटोंमध्ये काही लोक विमानाच्या मागच्या बाजुने बाहेर पडताना दिसत आहेत. 

अपघातानंतर विमानतळ बंद करण्यात आला असून अन्य विमानांना दुसरीकडे वळविण्यात आले आहे. विमानामध्ये 20 जण परदेशी नागरिक होते, तर उर्वरीत तुर्कीचे नागरिक होते. इस्तंबुलचे गव्हर्नर अली येरलीकाया यांनी सांगितले की, पेगासस विमान वाहतूक कंपनीचे हे विमान खराब हवामानामुळे रनवेवर 50 ते 60 मीटर घसरले. 

जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये दक्षिण कोरियाचा एक नागरिक असून सर्व जखमींवर विविध इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. विमान दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातAirportविमानतळairplaneविमान