मध्य पूर्वेतील युद्धाच्या भडक्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी ठप्प झाली असतानाच, इराणने महत्त्वाची भूमिका घेतली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराकची यांनी स्पष्ट केले की, होर्मुझची सामुद्रधुनी जगातील सर्व राष्ट्रांसाठी खुला आहे, केवळ शत्रूंसाठी बंद असेल. इराणच्या या भूमिकेमुळे गेल्या १५ दिवसांपासून समुद्रात अडकून पडलेल्या ७५० जहाजांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परराष्ट्र मंत्री अराक म्हणाले की, "होर्मुझ सामुद्रधुनी सागरी वाहतुकीसाठी खुली आहे. ती केवळ आमच्या शत्रू राष्ट्रांच्या आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या मालकीच्या टँकर्ससाठी बंद आहे, जे आमच्यावर सतत हल्ले करत आहेत. इतर सर्व देशांच्या व्यापारी जहाजांना या मार्गावरून जाण्यास काहीच अडचण नाही."
इराणच्या या विधानामुळे सर्वात मोठा दिलासा अडकून पडलेल्या मालवाहू जहाजांना मिळण्याची चिन्हे आहेत. नौवहन मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, सुमारे ७५० होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकून पडले आहेत, यात एकूण २८ भारतीय मालवाहू जहाजे या भागात अडकली आहेत. यातील २४ जहाजे पश्चिमेला आणि ४ जहाजे पूर्व भागात अडकून पडली आहेत. ही जहाजे अडकल्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईची भीती निर्माण झाली आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. फेब्रुवारी २०२६ मधील दर ६९.०१ डॉलर्स प्रति बॅरल होते. तर, १२ मार्च २०२६ मध्ये हे दर १२७.२२ डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. अवघ्या १२ दिवसांत कच्च्या तेलाचा सरासरी भाव प्रति बॅरल तब्बल ३२ डॉलर्सनी वाढला आहे.
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्के तेल ४० देशांकडून आयात करतो. १२ मार्च रोजी तेलाचे भाव १२७ डॉलरवर पोहोचल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. मात्र, इराणने भारतासारख्या मित्रराष्ट्रांसाठी मार्ग खुला ठेवल्यास, ही दरवाढ काही प्रमाणात स्थिरावण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
Web Summary : Iran declares Hormuz Strait open globally, closed only to hostile nations. This offers potential relief for stranded ships, including Indian vessels, and could stabilize rising oil prices.
Web Summary : ईरान ने होर्मुज जलडमरूमध्य को विश्व स्तर पर खुला घोषित किया, केवल शत्रु राष्ट्रों के लिए बंद। इससे फंसे जहाजों, जिनमें भारतीय जहाज भी शामिल हैं, को संभावित राहत मिलती है, और तेल की बढ़ती कीमतों को स्थिर किया जा सकता है।