शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

होर्मुझमध्ये युद्धनौका पाठविण्यास कोणी तयार होईना, अमेरिकेने एकट्यानेच सुरु केले ऑपरेशन...; ५००० पाउंड्सचे बंकर बस्टर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 08:30 IST

Strait of Hormuz America Attack: अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीजवळ इराणच्या गुप्त क्षेपणास्त्र तळावर बंकर बस्टर बॉम्बने हल्ला केला आहे. इराणच्या लष्करी शक्तीला मोठा धक्का. वाचा सविस्तर.

मध्य-पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणला मोठा लष्करी दणका दिला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ असलेल्या इराणच्या एका अतिसुरक्षित आणि जमिनीखालील क्षेपणास्त्र तळावर अमेरिकेने ५,००० पाउंड वजनाच्या शक्तिशाली 'बंकर बस्टर' बॉम्बचा वर्षाव केला आहे. या हल्ल्यामुळे इराणची सागरी सुरक्षा आणि क्षेपणास्त्र क्षमता मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहे.

अमेरिकेने या मोहिमेत 'GBU-28' सारख्या विशेष बॉम्बचा वापर केला, जे जमिनीच्या अनेक फूट खाली असलेले काँक्रीटचे बंकर नष्ट करण्यास सक्षम आहेत. हा हल्ला ज्या ठिकाणी झाला, तो भाग जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. इराण येथून जहाजांवर हल्ले करण्याची तयारी करत असल्याचा अमेरिकेचा संशय होता. प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात इराणची अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि त्यांचे लाँचिंग पॅड्स पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.

युद्धाचा नवा टप्पा?इराणचे नेते अली लारीजानी यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेने केलेली ही कारवाई इराणसाठी मोठा इशारा मानली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच स्पष्ट केले होते की, अमेरिकेच्या हितसंबंधांना धक्का लावल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. या हल्ल्यानंतर इराणने आपल्या नौदलाला 'हाय अलर्ट'वर ठेवले असून, प्रतिहल्ल्याची धमकी दिली आहे.

अमेरिकेला सर्वांनी एकटे पाडले...होर्मुझ सामुद्रधुनी इराणने बंद केली होती. भारतीय आणि इराणशी चांगले संबंध असलेल्या देशांच्या तेल आणि एलपीजी जहाजांना जाण्याची इराणने परवानगी दिली होती. आपल्या देशाच्या जहाजांना होर्मुझमधून सोडविण्यासाठी अमेरिकेने जपान, ब्रिटन, चीन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांना आपल्या युद्धनौका पाठविण्यास सांगितले होते. परंतू, या देशांनी आपल्या युद्धनौका पाठविण्यास नकार कळविला होता. भारताने अमेरिकेपूर्वीच आपल्या तीन युद्धनौका होर्मुझमध्ये पाठविल्या होत्या. यानंतर अमेरिकेने इतर देशांना हे आवाहन केले होते. या देशांनी पाठ फिरविल्याने ट्रम्प यांनी लक्षात ठेवणार, होर्मुझ सोडविण्यासाठी आम्हाला कोणाची गरज नाही, असा इशारा देत एकट्यानेच होर्मुझ खाडी मोकळी करण्याचा निर्णय घेतला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : US Strikes Iran's Nuclear Site Alone in Hormuz Strait Operation

Web Summary : Amid tensions, the US bombed an Iranian underground missile site in Hormuz with 'bunker busters,' crippling its missile capabilities. Other nations declined to join, so the US acted independently after Iran allegedly threatened ships. Iran issued a high alert.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईWarयुद्धFuel Crisisइंधन टंचाईAmericaअमेरिका