शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 13:55 IST

अल-बरदेई हे १९९७ ते २००९ पर्यंत IAEA चे प्रमुख होते आणि २००५ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे...

इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे (IAEA) माजी महासंचालक मोहम्मद अल-बरदेई यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. "या वेड्याला कसेही करून तातडीने रोखा, अन्यथा संपूर्ण मध्यपूर्व आगीच्या गोळ्यात लोटला जाईल," असे आवाहन अल-बरदेई यांनी खाडी देश आणि संयुक्त राष्ट्रांना (UN) केले आहे.

ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका -मोहम्मद अल-बरादेई यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराण धोरणाचा तीव्र निषेध केला. तसेच, आखाती देशांना आणि संयुक्त राष्ट्रांना या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. त्यांनी 'एक्स'वर अरबी भाषेत लिहिले, "आखाती देशांच्या सरकारांना माझे आवाहन आहे की, हा वेडा मनुष्य संपूर्ण प्रदेशाला आगीचा गोळा बनवण्यापूर्वी, पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण सामर्थ्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न करावा. तसेच, एका वेगळ्या इंग्रजी पोस्टमध्ये, "हा वेडेपणा थांबवण्यासाठी काहीच करता येणार नाही का?" असा थेट प्रश्नही त्यांनी संयुक्त राष्ट्रांना विचारला आहे. 

अल-बरदेई हे १९९७ ते २००९ पर्यंत IAEA चे प्रमुख होते आणि २००५ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

भीषण जीवितहानी -ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा नवा अल्टीमेटम देऊन 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' उघडण्याची तंबी दिली आहे. मात्र, इराणने ही धमकी धुडकावून लावली आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या या संघर्षामध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले असून जागतिक बाजारपेठ अस्थिर झाली आहे. नागरी वस्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे युद्धगुन्ह्यांची भीतीही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जर ट्रम्प यांची धोरणे अशीच सुरू राहिली, तर संपूर्ण प्रदेश 'आगीचा गोळा' बनू शकतो, असे अल-बरादेई यांनी म्हटले आहे. तसेच, आखाती देशांना युद्ध टाळण्यासाठी राजनैतिक मार्गाने संवाद साधण्याचे आवाहन केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Stop This Madman: Ex-IAEA Chief Urges Action on Trump's Iran Policy

Web Summary : Ex-IAEA chief Al-Baradei warns Trump's Iran policy risks engulfing the Middle East. He urges Gulf states and UN intervention to prevent regional catastrophe amidst escalating tensions and potential war crimes.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणWarयुद्धunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ