इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 09:59 IST2025-04-21T09:58:46+5:302025-04-21T09:59:00+5:30

अमेरिकेसोबत व्यापार करार करण्याचा विचार करणाऱ्या देशांना हा इशारा देण्यात आला आहे. यात भारतही येतो.

Stop here...! If you make a trade deal with America, remember; China's threat to the world | इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी

इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी

अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉरमध्ये जग पिचले गेले आहे. अमेरिकेने इतर देशांवरही टेरिफ लादले आहे. यामुळे हे देश अमेरिकेसोबत मिळते-जुळते घेण्याचा विचार करत आहेत. या देशांना चीनने धमकी दिली आहे. अमेरिकेसोत व्यापारी समझोता केल्यास बिजिंगला नुकसान होईल, यामुळे जर असे केले तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, असा इशारी चीनने या देशांना दिला आहे. 

अमेरिकेसोबत व्यापार करार करण्याचा विचार करणाऱ्या देशांना हा इशारा देण्यात आला आहे. यात भारतही येतो. अमेरिका चीनसोबतचा व्यापार कमी करण्याच्या बदल्यात इतर देशांना लादलेल्या शुल्कात सवलत देऊ शकतो. शेवटी सर्वच देशांना आपापला फायदा पहायचा आहे. मालाची आदानप्रदान सुरु राहिली तरच या देशांचा फायदा आहे. कारण अमेरिकेतून येणाऱ्या मालापेक्षा अमेरिकेला पाठविला जाणारा माल हा जास्त आहे, यावरच या देशांचे अर्थार्जन चालते. परंतू, आता चीनने असा इशारा दिल्याने या देशांनी करायचे काय, कोणत्या महाशक्तीसमोर झुकायचे असा सवाल उपस्थित होत आहे. 

सर्व पक्षांनी अमेरिकेशी समान आधारावर संवादाद्वारे त्यांचे आर्थिक आणि व्यापारी मतभेद सोडविण्याची गरज आहे, याचा चीन आदर करतो. परंतू अशा करारांमुळे जर आमचे नुकसान झाले तर आम्ही गप्प बसणार नाही. या देशांविरोधात प्रत्यूत्तराची कारवाई करणार, असा इशारा दिला आहे. 

जर असा कोणताही करार झाला तर चीन तो कधीही स्वीकारणार नाही आणि त्याला कडक आणि त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देईल, असे चीनच्या वाणिज्य खात्याने म्हटले आहे. खुशामत केल्याने शांतता येणार नाही आणि कराराचा आदर केला जाणार नाही. त्यांनी अमेरिकेच्या दबावापुढे झुकणे हे मूर्खपणाचे असेल असे चीनने म्हटले आहे. 
 

Web Title: Stop here...! If you make a trade deal with America, remember; China's threat to the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.