शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

होर्मुजवरचे हल्ले थांबवा, २२ देशांचे इराणला आवाहन; PM मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 05:51 IST

इराणच्या नतांझ अणुस्थळावर पुन्हा हल्ला; रशियाने हल्ल्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे थेट उल्लंघन म्हटले

दुबई : मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाच्या चौथ्या आठवड्यात शनिवारी इराणच्या नतांझ या युरेनियम समृद्धी केंद्रावर पुन्हा हवाई हल्ला झाल्याने तणाव तीव्र झाला आहे. या हल्ल्यात इराणने किरणोत्सर्गाची गळती नसल्याचा दावा केला आहे, असे वृत्त इराणमधील मिझान या निमसरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे. तेहरानपासून सुमारे २२० किमी अंतरावर असलेले हे केंद्र  गेल्यावर्षी जूनमधील १२ दिवसांच्या युद्धात अमेरिकेकडून लक्ष्य झाले होते. या हल्ल्याचा रशियाने तीव्र निषेध करत हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे थेट उल्लंघन असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्करी कारवाया हळूहळू कमी करण्याचे संकेत दिले आहेत. पण, त्यांनी युद्धविराम होणार नाही असेही स्पष्ट केले. जेव्हा आपण प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत असतो, तेव्हा युद्धविराम केला जात नाही, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प लष्करी कारवाया कमी करण्याची भाषा करत असतानाच अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर सैन्य व युद्धनौका तैनात केल्या जात आहेत. 

२२ देशांचे इराणला आवाहन

यूएई, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान, द. कोरिया, ऑस्ट्रेलियासह २२ देशांनी इराणला हल्ले थांबवून होर्मुझ मार्ग पुन्हा खुला करण्याचे आवाहन केले आहे. 

इराणमध्ये ईद साजरी

तेहरानमध्ये शनिवारी ईद-उल-फितरच्या नमाजासाठी हजारो नागरिक एकत्र आले. युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही प्रार्थना अधिक भावनिक वातावरणात पार पडली. नागरिक शुभेच्छा देत होते.

‘पॅट्रियट’ क्षेपणास्त्रांचे युरोपमधून पश्चिम आशियात स्थलांतर 

इराणविरोधातील युद्धावर लक्ष केंद्रित करत अमेरिकेने मोठ्या प्रमाणात ‘पॅट्रियट’ क्षेपणास्त्र प्रणाली युरोपमधून आखातात वळवली आहे. या रणनीतीमुळे रशियाविरोधात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युरोपच्या हवाई संरक्षण व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. इराण युद्धामुळे अमेरिकेच्या क्षेपणास्त्र साठ्यावर ताण वाढत आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाने ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’साठी पुरेसा लष्करी साठा उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. पॅट्रियट’ क्षेपणास्त्रे शत्रूच्या क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करतात. १९९२-९३ च्या इराक युद्धात ही क्षेपणास्त्रे वापरण्यात आली होती.

युद्ध चौथ्या आठवड्यात

२८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षाला आता चार आठवडे पूर्ण होत आले आहेत. या काळात हवाई हल्ले, ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्रांचा मारा सातत्याने सुरू आहे. युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नसून त्याचे चटके संपूर्ण जगाला बसू लागले आहेत.

लष्करी कारवाया कमी करणे आणि अधिक सैन्य तैनातीवरून संभ्रम 

शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी कारवाया कमी करण्याचा विचार सुरू असल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात अमेरिकेची हालचाल याउलट दिसते. अमेरिकेने आखातात अतिरिक्त ३ युद्धनौका आणि सुमारे २,५०० मरीन सैनिक पाठवले आहेत. याआधीही तितकेच सैनिक प्रशांत महासागरातून वळवण्यात आले होते.  शिवाय आखातात अनेक देशांमध्ये अमेरिकेचे आधीच ५०,००० हून अधिक सैनिक तैनात आहेत. याशिवाय, युद्धासाठी २०० अब्ज डॉलरच्या निधीची मागणी अमेरिकेच्या काँग्रेसकडे करण्यात आली आहे. यावर मतदान होईल. पण त्यामुळे ट्रम्प प्रशासनाचे उद्दिष्ट नेमके काय आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

दिएगो गार्सियावर इराणचे क्षेपणास्त्र

हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया या अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी तळावर इराणने दोन क्षेपणास्त्र डागल्याचे वृत्त आहे. इराणने आखात सोडल्यास पहिल्यांदाच ४००० किमी एवढ्या लांब पल्ल्याच्या ठिकाणी क्षेपणास्त्र डागले आहे. या हल्ल्यामुळे इराणकडे अधिक दूर पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा साठा असल्याचे संकेत मिळाले आहेत. या हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे ब्रिटनचे म्हणणे आहे. पण अमेरिका-ब्रिटनच्या या संयुक्त हवाई तळाला इराणने लक्ष्य साधल्याबद्दल ब्रिटनने तीव्र निषेध नोंदवला. हा तळ चागोस बेटसमूहात असून येथे अमेरिकेचे सुमारे २,५०० सैनिक तैनात आहेत. व्हिएतनामपासून इराक, अफगाणिस्तानपर्यंत अनेक लष्करी मोहिमांसाठी या तळाचा वापर करण्यात आला आहे. या तळावरून अमेरिकेच्या बॉम्बर्सना हल्ले करण्याची मूभा आहे. ब्रिटन अमेरिकेचा मित्र असला तरी तो या युद्धात सहभागी झालेला नाही.  

इराणवर तीव्र हल्ले करणार : इस्रायल

शनिवारी इस्रायलने इराणविरोधातील हल्ले पुढील आठवड्यात लक्षणीय वाढवले जातील, असा इशारा दिला आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कात्झ यांनी हा इशारा दिला. त्यांच्या वक्तव्यानुसार, इराणच्या लष्करी आणि पायाभूत संरचनेवर लक्ष्य केंद्रित करून इस्रायल आणि अमेरिकेचे सैन्य संयुक्त कारवाया अधिक तीव्र करणार आहे. ट्रम्प यांनी लष्करी कारवाया कमी करण्याचे संकेत दिल्यानंतर काही तासांतच इस्रायलने हा इशारा दिला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. या वेळी त्यांनी युद्धग्रस्त प्रदेशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा निषेध नोंदवत सागरी मार्ग सुरक्षित आणि खुले ठेवण्यावर भर दिला. जागतिक पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी ‘नेव्हिगेशनचे स्वातंत्र्य’ अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : 22 Nations Urge Iran to Halt Attacks; Modi Calls Iranian President

Web Summary : Amidst rising Middle East tensions, 22 nations urge Iran to cease attacks. PM Modi spoke with Iran's President, emphasizing safe sea lanes for global supply.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरNarendra Modiनरेंद्र मोदीIranइराणIndiaभारतIndiaभारत