“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 08:32 IST2026-04-10T08:28:57+5:302026-04-10T08:32:02+5:30

Donald Trump Iran War: युरोपियन संघानेही इराणच्या टोलविषयक अटीवर नाराजी व्यक्त केली आहे.

stop all this immediately donald trump warns iran over tariffs on hormuz | “हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा

“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा

Donald Trump Iran War: अमेरिका आणि इराणमधील युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी पाकिस्तानच्या राजधानीत एका ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाच्या शांतता चर्चेस सुरुवात होत आहे. या चर्चेचे यजमानपद पाकिस्तान भूषवत आहे. दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धबंदीनंतर आता कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि इराण या देशांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये आमनेसामने येणार आहेत. इस्रायलचे शिष्टमंडळ यात सहभागी होणार नाही. यातच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी इराण शुक्ल आकारत असल्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इशारा दिला आहे.

सध्या सुमारे २३० तेलवाहू जहाजे या सामुद्रधुनीतून बाहेर पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. इराणने या मार्गावर आता 'टोल' (शुल्क) आकारण्याची आणि जहाजांना स्वतःच्या किनारपट्टीजवळून प्रवास करण्यासची नवी अट घातली आहे. युरोपियन संघाने इराणच्या टोलविषयक अटीवर नाराजी व्यक्त केली असून ही वाहतूक विनाशुल्क आणि कोणत्याही कराशिवाय झाली पाहिजे. सर्व देशांना जलवाहतुकीचे स्वातंत्र्य असले पाहिजे. टोल मागणे हे नियमांच्या विरुद्ध आहे. जलवाहतुकीचे स्वातंत्र्य ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक संपत्ती असून तिची सुरक्षा निश्चित करणे आवश्यक आहे. या मार्गावरील वाहतूक ही निर्धोक व सुरक्षित होण्यासाठी सर्व उपाययोजना तैनात असाव्या, असे म्हटले आहे. 

हे सगळे लगेचच थांबवा, ट्रम्प यांचा इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून शुक्ल आकारणीला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. इराण, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या टँकर्सकडून शुल्क आकारत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांनी तसे मुळीच करू नये; आणि जर ते तसे करत असतील, तर त्यांनी ते आताच्या आता थांबवले पाहिजे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलाची वाहतूक होऊ देण्याच्या बाबतीत इराण अत्यंत सुमार कामगिरी करत आहे. काही तर याला 'अपमानास्पद' असेही म्हणतील. आमचा झालेला करार हा मुळीच तसा नाही!, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. 

दरम्यान, इराणच्या निमलष्करी ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने युद्धादरम्यान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत समुद्री सुरुंग पेरले असण्याची शक्यता वर्तवणारा एक नकाशा प्रसिद्ध केला. इराणच्या निमशासकीय वृत्तसंस्था ‘इसना’ आणि ‘तस्नीम’ यांनी हा नकाशा प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली. तेलवाहू जहाजांना ओमानच्या किनारपट्टीऐवजी आता इराणच्या किनारपट्टीजवळून, म्हणजेच उत्तर मार्गाने प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. या मार्गावरून सुरक्षितपणे जाण्यासाठी इराणच्या नौदलाशी समन्वय साधणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. हा नकाशा प्रसिद्ध करून इराणने अमेरिकेवर दबाव निर्माण केल्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title : तत्काल रोको: ट्रम्प ने होर्मुज जलडमरूमध्य टोल पर ईरान को चेतावनी दी

Web Summary : ट्रम्प ने ईरान को होर्मुज जलडमरूमध्य में टैंकरों से शुल्क लेने के खिलाफ चेतावनी दी। उन्होंने जोर देकर कहा कि यह उनके समझौते का उल्लंघन है, और तत्काल रोकने की मांग की। ईरान द्वारा सुरक्षित मार्ग के लिए नौसेना समन्वय पर विचार करने से तनाव बढ़ गया।

Web Title : Stop Immediately: Trump Warns Iran Over Hormuz Strait Tolls

Web Summary : Trump warns Iran against charging tankers in the Hormuz Strait. He insists it violates their agreement, demanding an immediate halt. Tensions rise as Iran reportedly considers naval coordination for safe passage.