पोटच्या १३ मुलांचा डांबून केला छळ, अमेरिकेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 03:40 IST2018-01-20T03:39:56+5:302018-01-20T03:40:00+5:30

पोटच्या १३ मुलांना घरात कोेंडून आणि साखळीने बांधून ठेवणा-या अमेरिकेतील दाम्पत्याच्या क्रोर्याची एक घटना समोर आली आहे.

Stomach up to 13 children in the stomach, American type | पोटच्या १३ मुलांचा डांबून केला छळ, अमेरिकेतील प्रकार

पोटच्या १३ मुलांचा डांबून केला छळ, अमेरिकेतील प्रकार

लॉस एंजिलिस : पोटच्या १३ मुलांना घरात कोेंडून आणि साखळीने बांधून ठेवणा-या अमेरिकेतील दाम्पत्याच्या क्रोर्याची एक घटना समोर आली आहे. या दाम्पत्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले असून दोषी ठरल्यास त्यांना ९४ वर्षांची शिक्षा होऊ शकते.
घरात १३ मुलांना कुपोषित अवस्थेत डांबून ठेवल्याबद्दल कॅलिफोर्नियातील जोडप्याला
अटक करण्यात आली. यातील
काही मुलांना अंधारात पलंगाला बांधून ठेवलेले होते. डेव्हिड अ‍ॅलेन टुर्पिन (५७) आणि लुईस अ‍ॅना टुर्पिन (४९) यांच्यावर मुलांचा छळ केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दाम्पत्याने बांधून ठेवलेल्या मुलांसोबत एवढा क्रूरपणा केला की, या मुलांना बाथरुमला जाण्यासाठीही सोडण्यात येत नव्हते. रविवारी १७ वर्षांच्या मुलीने तेथून कशीबशी सुटका करून घेऊन पोलिसांना हा प्रकार दूरध्वनी करून सांगितला. (वृत्तसंस्था)

कॅलिफोर्नियातील पेर्रीस येथे हे घर असून, त्यात दोन ते २९ वर्षे वयाची १३ मुले होती. चौकशीमध्ये काही मुलांना पलंगाला अंधारात साखळ्या आणि त्यांना कुलुपे लावून बांधून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले. तेथून दुर्गंधीही येत होती. मुलांना अशा पद्धतीने का डांबून ठेवले ते पालक सांगू शकले नाहीत.

Web Title: Stomach up to 13 children in the stomach, American type