शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 17:43 IST

अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री स्टिफेन बिगन सोमवारी म्हणाले,  य चारही देशांची बैठक लवकरच दिल्लीत होण्याची आशा आहे. या बैठकीत या प्रस्तावित संघटनेसंदर्भात आणि सैन्य सहकार्यासंदर्भात चर्चा होईल.

ठळक मुद्देभारत (India), जपान आणि ऑस्ट्रेलियाला सोबत घेऊन नाटो सारखीच एक संघटना तयार करण्याची अमेरिकेची इच्छा आहे.या चारही देशांची बैठक लवकरच दिल्लीत होण्याची आशा आहे.या बैठकीत या प्रस्तावित संघटनेसंदर्भात आणि सैन्य सहकार्यासंदर्भात चर्चा होईल.

वॉशिंग्टन - दक्षिण आशिया आणि दक्षीण चीन समुद्रात (South China Sea) चीनच्या वाढत्या दादागीरीला लगाम घालण्यासाठी अमेरिकेने आता मास्टर प्लॅन तयार केला आहे. इंडो-पॅसिफिक भागातील आपले सहकारी, असलेल्या भारत (India), जपान आणि ऑस्ट्रेलियाला सोबत घेऊन नाटो सारखीच एक संघटना तयार करण्याची अमेरिकेची इच्छा आहे. चीनला लगाम घालण्यासाठी नार्थ अॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो) सारखीच एक संघटना या भागातही असणे अत्यंत आवश्यक आहे, असे अमेरिकेला वाटते.

अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री स्टिफेन बिगन सोमवारी म्हणाले,  या चारही देशांची बैठक लवकरच दिल्लीत होण्याची आशा आहे. या बैठकीत या प्रस्तावित संघटनेसंदर्भात आणि सैन्य सहकार्यासंदर्भात चर्चा होईल. बिगन यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये म्हणाले, अमेरिकेचे लक्ष्य या चार देशांसोबत इतर देशांना एकत्र आणून चिनी आव्हानाचा सामना करणे आहे. बिगन यांनी भारतातील अमेरिकेचे माजी राजदूत राहिलेल्या रिचर्ड वर्मा यांच्याशी ऑनलाईन चर्चेत भाग घेतला होता.

नाटो सारख्या संघटनेची आवश्यकता -बिगन म्हणाले, इंडो-पॅसिफिक भागात शक्तीशाली स्ट्रक्चरची कमतरता आहे. त्यांच्याकडे नाटो अथवा यूरोपीय यूनियन (ईयू) सारखे शक्तीशाली संघटन नाही. जेव्हा नाटोची सुरुवात झाली, तेव्हा अनेक देशांनी नाटोचे सदस्य होण्याऐवजी तटस्थ राहणे पसंत केले होते. अशा प्रकारचे संघटन होण्यासाठी इतर देश अमेरिके प्रमाणे वचनबद्ध असायला हवे. मलाबार नेव्हल एक्सरसाईजमध्ये ऑस्ट्रेलियाने सहभाग घेणे, हे डिफेन्स ब्लॉक तयार करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, असेही बिगन यांनी म्हटले आहे.

दक्षीण चायना मॉर्निंग पोस्टनुसार, मलाबार नेव्हल एक्सरसाईजमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सहभागासंदर्भात भारत स्पष्ट संकेत देत आहे. बिगन म्हणाले, क्वाड्रीलेटरल सिक्योरिटी डायलॉग (क्वाड) देशांत व्हिएतनाम, दक्षीण कोरिया आणि न्युझीलंडलाही सहभागी करायल हवे. यात आता भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेचा समावेश आहे. याचा हेतू इंडो-पॅसिफिक भागात शांतता प्रस्थापित करणे असा आहे. 

मलाबार नेव्हल एक्सरसाइज म्हणजे काय?अमेरिका आणि भारत यांच्यात 1992 पासून मलाबार नेव्हल एक्सरसाईज होते. ही एक्सरसाईज अधिकांश बंगालच्या खाडीत होत असते. 2015 पासून यात जपानचाही सहभाग आहे. एकदा 2007 मध्ये ऑस्ट्रेलियानेही यात सहभाग घेतला होता. मात्र, चीनने व्यापार कमी करण्याची धमकी दिल्यानंतर ऑस्ट्रेलिया यापासून दूर झाला. 2007 मध्ये सिंगापूरनेही यात सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने यावेळी पुन्हा या एक्सरसाईजमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पंचत्वात विलीन

डास माणसाचं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी सांगितलं हैराण करणारं कारण

मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे 'हराम' आहे; वादग्रस्त इमामांचं वक्तव्य

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाAustraliaआॅस्ट्रेलियाIndiaभारतJapanजपानchinaचीनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी