"अजूनही इराणमध्ये राहत असलेल्या भारतीयांनी पुढील ४८ तास जिथे असाल, तिथेच राहावे", असे आवाहन भारतीय दूतावासाने केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण संस्कृती उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्यानंतर भारताने ही सूचना जारी केली आहे.
बाहेर पडण्याआधी दूतावासासी संपर्क करा
इराणमध्ये राहत असलेल्या भारतीयांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास दूतावासाने म्हटले आहे. भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, "इराणमधील भारतीयांनी वीज केंद्र, लष्करी ठिकाणांपासून दूर रहावे. त्याचबरोबर बहुमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणे टाळावे. लोकांनी घरातच रहावे आणि जर त्यांना महामार्गावर कुठे जायचे असेल, तर दूतावासाशी संपर्क करावा."
"जे लोक दूतावासाने व्यवस्था केलेल्या हॉटेल्समध्ये राहत आहेत. त्यांनी बाहेर पडू नये आणि स्थानिक दूतावासाशी सातत्याने संपर्क करत रहावे", असा मेसेज दूतावासाकडून देण्यात आला आहे.
इराणच्या संस्कृतीची आज अखेरची रात्र, ट्रम्प यांची धमकी
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटले की, "आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल, जी पुन्हा कधीही परत येणार नाही. हे असे व्हावे अशी माझी इच्छा नाहीये, पण कदाचित ते घडेलच."
"आता आपल्याकडे पूर्ण आणि संपूर्ण सत्तापालट झाला आहे, जिथे विविध, अधिक हुशार आणि कमी धर्मांध असलेले लोक प्रभावी ठरतील, कदाचित काहीतरी क्रांतिकारी आणि अद्भुत घडू शकेल, कोणास ठाऊक? जगाच्या एका मोठ्या आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक काय आहे, हे आपल्याला आज रात्री कळेल. ४७ वर्षांच्या खंडणी, भ्रष्टाचार आणि हत्यांचा आज शेवट होईल. इराणच्या महान जनतेवर ईश्वराची कृपा राहो", अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.
Web Summary : Following Trump's threat to target Iranian culture, India has advised its citizens in Iran to remain where they are for the next 48 hours. The Indian embassy urged them to avoid military sites, power plants, and upper floors of buildings, and to contact the embassy before traveling.
Web Summary : ईरानी संस्कृति को निशाना बनाने की ट्रंप की धमकी के बाद, भारत ने ईरान में अपने नागरिकों को अगले 48 घंटों तक वहीं रहने की सलाह दी है जहाँ वे हैं। भारतीय दूतावास ने उनसे सैन्य स्थलों, बिजली संयंत्रों और इमारतों की ऊपरी मंजिलों से बचने और यात्रा करने से पहले दूतावास से संपर्क करने का आग्रह किया है।