श्रीलंकेचे पंतप्रधान करणार चीन दौरा
By Admin | Updated: April 4, 2016 02:40 IST2016-04-04T02:40:48+5:302016-04-04T02:40:48+5:30
श्रीलंकेत चिनी गुंतवणुकीवरून वाद निर्माण झालेला असतानाच पंतप्रधान राणिल विक्रमसिंघे या आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर जात आहेत

श्रीलंकेचे पंतप्रधान करणार चीन दौरा
कोलंबो : श्रीलंकेत चिनी गुंतवणुकीवरून वाद निर्माण झालेला असतानाच पंतप्रधान राणिल विक्रमसिंघे या आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर जात आहेत. उभय देशांतील संबंध आणखी वृद्धिंगत करण्याचा त्यांचा उद्देश आहे.
श्रीलंकेत महिंदा राजपक्षे यांची राजवट असताना त्यांनी १.५ अब्ज डॉलरच्या चीनच्या गुंतवणुकीला परवानगी दिली होती. ही गुंतवणूक विशेषत: बंदरांचा आणि शहरांच्या विकासात केली जाणार आहे. विक्रमसिंघे बुधवारी चीनला रवाना होत असून त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा राहणार आहे. ते चीनचे अध्यक्ष शी चिनफिंग आणि पंतप्रधान ली क्विंग यांच्याशी चर्चा करतील. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे.