शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

भारताची चिंता धुडकावून श्रीलंकेची चीनशी हातमिळवणी

By admin | Updated: April 11, 2016 02:21 IST

हिंदी महासागरात चीनचा रणनीतिक फायदा घेण्याच्या भूमिकेबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त करूनही श्रीलंकेने पायाभूत विकासासाठी आपल्या देशात चीनला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

बीजिंग : हिंदी महासागरात चीनचा रणनीतिक फायदा घेण्याच्या भूमिकेबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त करूनही श्रीलंकेने पायाभूत विकासासाठी आपल्या देशात चीनला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी श्रीलंका आणि चीन सरकार सागरी रेशमी मार्गाचा वापर करतील.श्रीलंकेच्या विकासासाठी सागरी रेशमी मार्गाचा वापर करण्याचा प्रस्ताव चीनचे अध्यक्ष शी चिनफिंग यांनी मांडला होता. तो श्रीलंका सरकारने मान्य केला. त्यामुळे हिंदी महासागरात हालचाली वाढविण्यास चीनला आपोआपच संधी मिळाली आहे.श्रीलंकेचे पंतप्रधान रॅनिल विक्रमसिंघे चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर आले होते. त्यांचा दौरा समाप्त झाल्यानंतर उभय देशांतर्फे जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, श्रीलंकेने चीनद्वारे प्रस्तावित ‘बेल्ट अँड रोड इनेथिटिव्ह’ सक्रिय भागीदारी केली जाणार आहे. दोन्ही पक्ष २१ व्या शतकात सागरी रेशमी मार्गाच्या (एमएसआर) विकासाचा उपयोग पायाभूत प्रकल्पाच्या विकासासाठी करतील. चीनचे अध्यक्ष शी चिनफिंग यांनी २०१३ मध्ये सादर केलेल्या प्रस्तावात एमएसआरच्या वापराचा उल्लेख होता. आता या मार्गाचा वापर करण्यात येणार असल्याने चीनचे हिंदी महासागरातील वर्चस्व वाढेल, असे माहीतगार सूत्रांचे म्हणणे आहे.याबाबत श्रीलंकेची भूमिका स्पष्ट करताना श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे म्हणाले की, हिंदी महासागर हा आर्थिक केंद्र बनावा, असे आमचे धोरण आहे. त्यासाठी आम्ही एक बेल्ट आणि एक रेशमी मार्ग, तसेच मेक इन इंडिया’ या उपक्रमांचा संयुक्तरीत्या फायदा करून घेऊ इच्छितो.या संयुक्त निवेदनात चीन-श्रीलंका मुक्त समझोत्यानुसार चाललेली चर्चा, संयुक्त उपक्रमांना चालना देणे, आर्थिक, सांस्कृतिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि दोन्ही देशांतील लोकांत संपर्क वाढविण्याच्या बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.विक्रमसिंघे म्हणाले की, हिंदी महासागरातील मालवाहू जहाजांच्या स्वातंत्र्याबद्दल श्रीलंका सरकार वचनबद्ध आहे. सागरी चाच्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी भारताने मोहीम उघडली आहे. त्यासाठी भारतीय नौदल तेथे आहे. चीनही जिबुती येथे तळ उभारत आहे. याशिवाय अन्य काही देश या भागात आपले तळ उभारत आहेत. सागरी चाच्यांविरुद्धची मोहीम संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेचा एक भाग आहे. अमेरिकेसह अनेक देशांचे नौदल हिंदी महासागरात सक्रिय आहे. श्रीलंकेतील बंदराच्या विकासाची योजना गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित होती. आता ती स्थिती बदलली आहे. (वृत्तसंस्था)