Sri Lanka Crisis : आमची मातृभूमी वाचविण्यासाठी मदत करा...; लंकेतील विरोधीपक्षाची PM मोदींकडे मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 14:15 IST2022-04-04T14:15:27+5:302022-04-04T14:15:38+5:30
कमी होत चाललेली परकीय गंगाजळी आणि ईंधन तथा अन्नाची तीव्र टंचाईसोबतच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली श्रीलंका गेल्या काही दशकांत आपल्या सर्वात खराब आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

Sri Lanka Crisis : आमची मातृभूमी वाचविण्यासाठी मदत करा...; लंकेतील विरोधीपक्षाची PM मोदींकडे मोठी मागणी
कधीकाळी सोन्याची म्हणवली जाणारी लंका आज गंभीर आर्थिक संकटाचा सामना करताना दिसत आहे. यातच तेथील विरोधकांनी भारताकडे मदतीचे आवाहन केले आहे. श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे श्रीलंकेला शक्य तेवढी अधिक मदत करण्याचे आवाहन केले आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
कमी होत चाललेली परकीय गंगाजळी आणि ईंधन तथा अन्नाची तीव्र टंचाईसोबतच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली श्रीलंका गेल्या काही दशकांत आपल्या सर्वात खराब आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेचे विरोधीपक्षनेते साजिथ प्रेमदासा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश दिला आहे, कृपया प्रयत्न करा आणि श्रीलंकेला शक्य तेवढी मदत करावी. ही आमची मातृभूमी आहे आणि आम्हाला आमची मातृभूमी वाचवणे आवश्यक आहे.
तत्पूर्वी, मंत्रिमंडळाचा सामूहिक राजीनामा म्हणजे, "देशातील जनतेची फसवणूक करण्यासाठी रचलेला मेलोड्रामा" असल्याचे प्रेमदासा यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर राजीनामे हा श्रीलंकेला दिलासा देण्याचा “खरा प्रयत्न” नसून “लोकांना मूर्ख बनवण्याची कसरत आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रेमदासा म्हणाले, श्रीलंकेला "ठोस बदल" हवा आहे, जो नागरिकांना दिलासा देईल, राजकारण्यांना नव्हे. राजकारण हा संगीत खुर्चीचा खेळ नाही.