दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा चौकशीला नकार, तपास बेकायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 07:30 IST2025-01-17T07:30:38+5:302025-01-17T07:30:47+5:30
Yoon Suk Yeol : येओल यांच्या मार्शल लॉच्या घोषणेमागे बंडखोरीचा प्रयत्न होता किंवा नाही, याचा तपास करण्यात येत आहे.

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा चौकशीला नकार, तपास बेकायदा
सेऊल : देशात मार्शल लॉ लागू केल्यामुळे महाभियोगाचा सामना करणारे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल हे पुढील चौकशीला नकार देणार असल्याचा दावा गुरुवारी त्यांच्या वकिलांनी केला. त्यांच्याविरोधातील चौकशी बेकायदेशीर असल्याचे वकिलांनी म्हटले आहे. देशाच्या भ्रष्टाचार विरोधी संस्थेने येओल यांना ताब्यात घेतले होते. (वृत्तसंस्था)
४८ तासांचा कालावधी
येओल यांनी मौन राहण्याच्या अधिकाराचा वापर करत अधिकाऱ्याच्या प्रश्रांची उत्तरे देणे टाळल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. येओल यांच्या मार्शल लॉच्या घोषणेमागे बंडखोरीचा प्रयत्न होता किंवा नाही, याचा तपास करण्यात येत आहे.
राष्ट्राध्यक्षांना औपचारिक अटक करायची किंवा सुटका करायाची, यासाठी भ्रष्टाचारविरोधी संस्थेकडे ४८ तासांचा वेळ आहे.