दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:10 IST2025-07-28T16:09:53+5:302025-07-28T16:10:52+5:30
'उत्तर कोरिया सध्या दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसोबत कोणत्याही राजनैतिक चर्चेत नाही,असं स्पष्टीकरण किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग यांनी दिले.

दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग यांनी दक्षिण कोरियाच्या नवीन सरकारने दिलेला शांतता चर्चेचा प्रस्ताव पूर्णपणे नाकारला आहे. याबाबत त्यांनी सोमवारी निवेदन जारी केले आहे. 'उत्तर कोरियाला दक्षिण कोरियाशी कोणत्याही प्रकारच्या चर्चेत रस नाही, मग तेथील सरकारने कोणताही प्रस्ताव आणला तरी', असं निवेदनात स्पष्ट केले आहे.
'उत्तर कोरिया सध्या दक्षिण कोरिया आणि अमेरिकेशी कोणत्याही प्रकारच्या राजनैतिक पुढाकार किंवा संवादाच्या मनस्थितीत नसल्याचे यावरुन दिसत आहे.
'आम्हाला कोणत्याही धोरणात किंवा प्रस्तावात रस नाही'
उत्तर कोरिया सध्या रशियाशी संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. रशिया-युक्रेन युद्ध संपल्यानंतर जर उत्तर कोरियाला हे लक्षात आले की ते रशियाशी असलेले पूर्वीचे संबंध टिकवून ठेवू शकणार नाहीत, तर ते आपली रणनीती बदलू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, दक्षिण कोरियाच्या राज्य माध्यमांनी निवेदन जारी केले. यामध्ये किम यो जोंग यांनी स्पष्ट केले की, "आम्ही पुन्हा एकदा सांगतो. आम्हाला सोलच्या कोणत्याही धोरणात किंवा प्रस्तावात रस नाही. आम्हाला त्यांना भेटण्याची गरज वाटत नाही किंवा त्यांच्याशी कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याचे कोणतेही कारण नाही."
तणावपूर्ण संबंध सुधारण्याच्या दिशेने पावले
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांच्या सरकारच्या धोरणावर उत्तर कोरियाकडून ही पहिली अधिकृत प्रतिक्रिया आहे. ली जे-म्युंग यांनी जूनच्या सुरुवातीला अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि तेव्हापासून त्यांनी उत्तर कोरियाशी तणावपूर्ण संबंध सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत.