शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाद पेटला! चीनची दक्षिण चिनी समुद्रातील 'त्या' भागावर ताबा घेण्याची धमकी; तैवान करणार युद्धाभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 11:53 IST

या सरावादरम्यान डोंगशा बेटांवर मोर्टार आणि मशीन गनच्या माध्यमातून तैवान ताकद दाखवणार आहे, असे तैवानने म्हटले आहे.

कोरोनाच्या संकटातही चीन अनेक देशांबरोबर शत्रुत्व घेत आहे. जगभरातील अनेक देशांचा कोरोना विषाणूमुळे चीनवर रोष आहे. त्यातच आता चीन आणि तैवानचा वाद वाढताना दिसत आहे. चीनने दक्षिण चीन समुद्रात तैवानच्या डोंगशा बेटावर कब्जा मिळवण्याची तयारी केल्यानं दोन्ही देशांमध्ये तणाव तीव्र झाला आहे. आता तैवानने जूनमध्ये या बेटावर गोळीबाराचा युद्धसराव करणार असल्याचे जाहीर केले आहे. या सरावादरम्यान डोंगशा बेटांवर मोर्टार आणि मशीन गनच्या माध्यमातून तैवान ताकद दाखवणार आहे, असे तैवानने म्हटले आहे.डोंगशा बेटांमध्ये एक बेट आणि दोन कोरल रीफ आहेत. त्याच्या दोन बाजू आहेत. तैवानने त्याला राष्ट्रीय उद्यान घोषित केले आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी ऑगस्ट महिन्यात दक्षिण चीन समुद्रात मोठ्या प्रमाणात लँडिंगचा सराव करणार असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. चीनचा एक प्रकारे डोंगशा बेटावर कब्जा करण्याची ही कूटनीती असेल.तैवानने आपल्या बेटांची सुरक्षा मजबूत केलीजपानच्या क्योडो न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, पीएलएचा लँडिंग सराव दक्षिण थिएटर कमांडतर्फे आयोजित केला जाणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात युद्धनौका, पाणी अन् जमिनीवर चालणाऱ्या हॉवरक्राफ्ट, हेलिकॉप्टर आणि मरीनचा समावेश असेल. दरम्यान, तैवानने चीनकडून आलेल्या कोणत्याही धाडसी प्रतिसादाला उत्तर देण्यासाठी डोंगशा बेटांवर कोस्ट गार्डचे दोन पथके तैनात केली आहेत.याव्यतिरिक्त 20, 40, 81 आणि 120 मिमी मोर्टारदेखील बेटांवर तैनात केले आहेत. तसेच पायदळ सैन्यासाठी आवश्यक असणारी उपकरणेही तटरक्षक दलाला देण्यात आली आहेत. इतकेच नाही तर या बेटांवरील लष्करी आस्थापनांची श्रेणीसुधारित केली गेली आहे. तैवान सरकारने म्हटले आहे की, चीनच्या कोणत्याही व्यापाराच्या प्रयत्नास प्रतिसाद देण्यावर पाळत ठेवणे आणि गुप्तहेर कामांवर विशेष लक्ष दिले जात आहे.दक्षिण चीन समुद्रात चीनची चाल काय?कोरोना विषाणूविरुद्धच्या युद्धावर चीनने जवळपास विजय मिळवला आहे. आता त्यांचे लक्ष दक्षिण चीन समुद्राकडे लागले आहे. चीन तेथे आपले लष्करी जाळं विस्तारत आहे. चीनची हरकत पाहता अमेरिकेनेही या भागात तीन युद्धनौका पाठविल्या आहेत. त्यानंतर या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.  चीनला दक्षिण चीन समुद्रातून पेट्रोकेमिकल्स आणि इतर खनिजे काढू इच्छित आहेत आणि त्या क्षेत्रात अणुभट्टी देखील तयार करता येऊ शकते.तज्ज्ञांचे मत आहे की, दक्षिण चीन समुद्रावर युद्ध परिस्थिती उद्भवू शकते, ज्यामध्ये चीन, अमेरिका आणि रशिया सामील होऊ शकतात. दुसरीकडे चीनचे संरक्षणमंत्री जनरल वे फूंगे म्हणाले की, अमेरिकेने युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास बीजिंग सर्वच स्तरावर लढायला तयार आहे. दक्षिण चीन समुद्र हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यात जगातील सर्वात महाग शिपिंग लेन आहे. दरवर्षी या मार्गावरून 3.4 ट्रिलियन पौंड व्यापार होतो. यूकेचा सागरी व्यापारातील 12 टक्के व्यापार, म्हणजे 97 अब्ज डॉलर्सची निर्यात आणि आयात या प्रदेशातून होते.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

दहशतवाद्यांना झटका! पाक सर्वोच्च न्यायालयानं २९० आतंकवाद्यांचा जामीन रोखला

CoronaVirus News : केंद्रीय अर्थमंत्री आज मोठ्या घोषणा करण्याची शक्यता, शेतकऱ्यांना जबरदस्त फायदा मिळणार?

52 दिवसांपासून ड्युटीवरच नर्स; अचानक मुलीचा व्हिडीओ कॉल आला अन् अश्रूंचा बांध फुटला

CoronaVirus News : पायी बिहारला जाणाऱ्या मजुरांना भरधाव रोडवेज बसने चिरडले, 6 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही; तो प्रयोगशाळेत तयार झालाय, नितीन गडकरींचं रोखठोक विधान

विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

टॅग्स :south china seaदक्षिण चिनी समुद्रchinaचीन