"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 14:17 IST2025-09-17T14:00:18+5:302025-09-17T14:17:44+5:30

Giorgia Meloni on Happy Birthday PM Modi: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मैत्रीपूर्ण राजकीय संबंध आहेत.

Source Of Inspiration said Italy PM Giorgia Meloni Wishes PM Modi On 75th Birthday | "आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा

"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा

Giorgia Meloni on Happy Birthday PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. आज ते ७५ वर्षांचे झाले. मागील ११ वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान म्हणून केलेल्या कामाचा आणि योजनांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. भारताला जगाच्या नकाशावर वेगळी उंची मिळवून देण्यासाठी पंतप्रधान मोदी सतत प्रयत्नशील आहेत. या काळात जसे मोदींचे भारतातील चाहते वाढले तसेच, परदेशातही त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले व मैत्रीपूर्ण राजकीय संबंध आहेत. त्यांनी आज मोदींना खास शुभेच्छा दिल्या.

"भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७५व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांची ताकद, त्यांचा दृढनिश्चय आणि लाखो लोकांचे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहे. मैत्री आणि सन्मानासह, मी त्यांना भारताला उज्ज्वल भविष्याकडे नेण्यासाठी आणि आपल्या राष्ट्रांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी चांगले आरोग्य आणि नवीनतम उर्जेसाठी शुभेच्छा देते," अशा शब्दांत मेलोनी यांनी मोदींना वाढदिवसाचा शुभसंदेश दिला.

 

Web Title: Source Of Inspiration said Italy PM Giorgia Meloni Wishes PM Modi On 75th Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.