मुलाला तुरुंगवास झाल्याने धक्का बसलेल्या वडिलांनी जीवन संपवल्याची घटना उत्तर प्रदेशमधील ललितपूर येथे घडली आहे. दरम्यान, मृत वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी आणलेल्या मुलाला हातकड्या घालून ठेवल्याने पोलिस अधीक्षकांनी तपास अधिकारी एसआय कमलेश कुमार यांच्यासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.
तुरुंगवास झालेला मुलगा शिवम राठोड याला वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन तासांच्या पॅरोलवर आणण्यात आले. मात्र अंत्यसंस्कारावेळी आरोपी शिवम राठोड याच्या हातातील हातकडी काढण्यात आली नाही. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्याबाबत लोकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
त्यानंतर पोलीस अधीक्षक मोहम्मद मुस्ताक यांनी शिवम राठोड याला वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेलेल्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एएसपी कालू सिंह याला सूचना दिली आहे.