सोशल व्हायरल - सिगारेटचं थोटुक टाकलं गटारात, गटार फुटून तोंडावर
By Admin | Updated: April 12, 2017 17:25 IST2017-04-12T17:25:43+5:302017-04-12T17:25:43+5:30
एक व्यक्ती सिगारेटचं थोटुक गटराच्या होलमध्ये टाकतो आणि त्यानंतर एक मोठा स्फोट होतो ज्यामध्ये अक्षरक्ष: तो गाडला जातो

सोशल व्हायरल - सिगारेटचं थोटुक टाकलं गटारात, गटार फुटून तोंडावर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - धुम्रपान आरोग्यासाठी धोकादायक आहे हे सर्वांनाच माहित आहे, आणि सध्या एका व्हिडीओमुळे हा धोका कोणत्याही पद्धतीने समोर येऊ शकतो हे सिद्ध झालं आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती सिगारेटचं थोटुक गटराच्या होलमध्ये टाकतो आणि त्यानंतर एक मोठा स्फोट होतो ज्यामध्ये अक्षरक्ष: तो गाडला जातो. ही घटना इरानमधील तेहरानमध्ये घडली असल्याचा अंदाज आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे.
या फुटेजमध्ये एक व्यक्ती या गटराजवळ येऊन थांबताना दिसत आहे. थोडावेळ तिथे थांबल्यानंतर तिथल्या होलात सिगारेटचं थोटुक टाकतो. त्यानंतर अनपेक्षितपणे एक मोठा स्फोट होतो. हा स्फोट इतका भीषण आहे की काही सेकंद सीसीटीव्ही फुटेजमध्ये फक्त मातीच दिसत आहे. हा स्फोट त्या व्यक्तीच्या तोंडावर झाल्याने तो नेमका जिवंत राहिलाय का ? असा प्रश्न पडतो. पण काही वेळानंतर मातीच्या ढिगा-यातून तो सरकताना दिसत आहे. त्याला शक्यतो गंभीर जखम झाली नसल्याची शक्यता आहे. मात्र त्याच्या धुम्रपानाच्या सवयीने त्याला जीवनाची अद्दल घडवली आहे.
در چاه های فاضلاب هیچ گونه موادی برای دیرتر پر شدن آنها نریزید،ته سیگار یا جرقه کافیست تا خا... pic.twitter.com/Jey6JFTZ61
— سر الکساندر (@Xerxesss) April 10, 2017
43 सेकंदाच्या या व्हिडीओत अगोदर एक व्यक्ती येऊन काही कचरा त्या होलात टाकत असल्याचं दिसतं. त्यानंतर हे महाशय येतात आणि सिगारेटचं थोटुक त्यात टाकतात. त्यानंतर क्षणातच त्या होलामधून एक मोठा स्फोट होतो. त्या व्यक्तीला काही कळण्याच्या आत तो जमिनीवर आडवा झालेला असतो. आपल्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातून तो जिवंत बाहेर पडण्यात मात्र यशस्वी झाला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून आतापर्यंत 12 लाख लोकांनी तो पाहिला आहे. अनेकजण या स्फोटाचं नेमकं कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.