शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

...म्हणून पॉर्नहबने वेबसाईटवरून हटवले लाखो व्हिडीओ, झाले होते हे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 1:52 PM

pornhub News : अश्लील चित्रपट जगतातील कुख्यात पॉर्न वेबसाईट असलेल्या पॉर्नहबने आपल्या साइटवरून लाखो अश्लील व्हिडीओ हटवले आहेत.

टोरँटो - अश्लील चित्रपट जगतातील कुख्यात पॉर्न वेबसाईट असलेल्या पॉर्नहबने आपल्या साइटवरून लाखो अश्लील व्हिडीओ हटवले आहेत. अशा युझर्सचे व्हिडिओ हटवण्यात आले आहेत जे या साइटवर व्हेरिफाइड नव्हते. theguardian.com ने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी कॅनडामधील या अ‍ॅडल्ट साइटवरील व्हिडिओंची संख्या घटून १३० लाखांवरून ४० लाखांपर्यंत आली होती.अल्पवयीन आणि सेक्स ट्रॅफिकिंगची शिकार झालेल्या मुलींचे व्हिडीओ साइटवरून हटवण्यात पॉर्नहबला अपयश आले असल्याचा आरोप या साइटवर झाला होता. त्यापूर्वी या संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह आणि अवैध व्हिडिओ असल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर व्हिसा आणि मास्टरकार्ड या क्रेडिट कार्ड कंपन्यांनी पॉर्नहबला पेमेंट प्रोसेस करणार नसल्याचे जाहीर केले होते. हा पॉर्नहबसाठी मोठा धक्का होता.दरम्यान, नव्या बदलांनुसार आता पॉर्नहबवर व्हेरिफिकेशन नसलेले युझर्स आपला कंटेट अपलोड करू शकणार नाहीत. कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितले की, साइटच्या सर्व कंटेंटसाठी व्हेरिफिकेशनची अट लागू झाली आहे. मात्र फेसबूक, इंस्ट्राग्राम, टिकटॉक, यूट्युबने मात्र असे धोरण लागू केलेले नाही. theguardian.com मधील माहितीनुसार पॉर्नहबच्या या निर्णयामुळे लाखो सेक्स वर्कर्स आणि मॉडेल्सची कमाई संकटात सापडली आहे. हे लोक कोरोनामुळे आधीच संकटात आहेत. आतापर्यंत या साइटवर कुठलाही युझर कंटेंट अपलोड करू शकत होता.

पॉर्नहबने सांगितले की, कंपनीला वेबसाइटच्या धोरणामुळे नव्हे तर हा एक अ‍ॅडल्ट कंटेंट प्लॅटफॉर्म असल्याने लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, एका वृत्तानुसार फेसबूकवर गेल्या तीन वर्षांत मुलांच्या यौन शोषणाबाबतचे ८ कोटी ४० लाख कंटेंट सापडल्याचे फेसबूकने सांगितले आहे. तर या काळात पॉर्नहबवर केवळ ११८ असे कंटेंट सापडल्याचे इंटरनॅशनल वॉच फाऊंडेशनने सांगितले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळInternationalआंतरराष्ट्रीय