...म्हणून पॉर्नहबने वेबसाईटवरून हटवले लाखो व्हिडीओ, झाले होते हे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 13:52 IST2020-12-15T13:52:02+5:302020-12-15T13:52:40+5:30
pornhub News : अश्लील चित्रपट जगतातील कुख्यात पॉर्न वेबसाईट असलेल्या पॉर्नहबने आपल्या साइटवरून लाखो अश्लील व्हिडीओ हटवले आहेत.

...म्हणून पॉर्नहबने वेबसाईटवरून हटवले लाखो व्हिडीओ, झाले होते हे आरोप
टोरँटो - अश्लील चित्रपट जगतातील कुख्यात पॉर्न वेबसाईट असलेल्या पॉर्नहबने आपल्या साइटवरून लाखो अश्लील व्हिडीओ हटवले आहेत. अशा युझर्सचे व्हिडिओ हटवण्यात आले आहेत जे या साइटवर व्हेरिफाइड नव्हते. theguardian.com ने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी कॅनडामधील या अॅडल्ट साइटवरील व्हिडिओंची संख्या घटून १३० लाखांवरून ४० लाखांपर्यंत आली होती.
अल्पवयीन आणि सेक्स ट्रॅफिकिंगची शिकार झालेल्या मुलींचे व्हिडीओ साइटवरून हटवण्यात पॉर्नहबला अपयश आले असल्याचा आरोप या साइटवर झाला होता. त्यापूर्वी या संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह आणि अवैध व्हिडिओ असल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर व्हिसा आणि मास्टरकार्ड या क्रेडिट कार्ड कंपन्यांनी पॉर्नहबला पेमेंट प्रोसेस करणार नसल्याचे जाहीर केले होते. हा पॉर्नहबसाठी मोठा धक्का होता.
दरम्यान, नव्या बदलांनुसार आता पॉर्नहबवर व्हेरिफिकेशन नसलेले युझर्स आपला कंटेट अपलोड करू शकणार नाहीत. कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितले की, साइटच्या सर्व कंटेंटसाठी व्हेरिफिकेशनची अट लागू झाली आहे. मात्र फेसबूक, इंस्ट्राग्राम, टिकटॉक, यूट्युबने मात्र असे धोरण लागू केलेले नाही. theguardian.com मधील माहितीनुसार पॉर्नहबच्या या निर्णयामुळे लाखो सेक्स वर्कर्स आणि मॉडेल्सची कमाई संकटात सापडली आहे. हे लोक कोरोनामुळे आधीच संकटात आहेत. आतापर्यंत या साइटवर कुठलाही युझर कंटेंट अपलोड करू शकत होता.
पॉर्नहबने सांगितले की, कंपनीला वेबसाइटच्या धोरणामुळे नव्हे तर हा एक अॅडल्ट कंटेंट प्लॅटफॉर्म असल्याने लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, एका वृत्तानुसार फेसबूकवर गेल्या तीन वर्षांत मुलांच्या यौन शोषणाबाबतचे ८ कोटी ४० लाख कंटेंट सापडल्याचे फेसबूकने सांगितले आहे. तर या काळात पॉर्नहबवर केवळ ११८ असे कंटेंट सापडल्याचे इंटरनॅशनल वॉच फाऊंडेशनने सांगितले.