... so China is very angry about the 85-year-old Dalai Lama, know Raj 'cause' | ... म्हणून 85 वर्षीय दलाई लामांबद्दल चीनला प्रचंड राग, जाणून घ्या राज'कारण'

... म्हणून 85 वर्षीय दलाई लामांबद्दल चीनला प्रचंड राग, जाणून घ्या राज'कारण'

ठळक मुद्दे सन 1409 मध्ये सिखांपाने जेलग शाळेची स्थापना केली होती, या शाळेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार करण्यात आला.साधारण 40 वर्षांनंतर चीनच्या लोकांनी तिबेटवर आक्रमण केले, त्यावेळी 14 वे दलाई लामा तिबेटचे गुरु होते. या लढाईत तिबेटला पराभवाचा सामना करावा लागला

मुंबई - भारत आणि चीनमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर दलाई लामा यांच्या वाढदिवसाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदीदलाई लामा यांना जाहीरपणे शुभेच्छा देतील का? असाही प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन आहे. चीन आणि तिबेटमधील इतिहासकालीन संघर्षामुळे दलाई लामांसदर्भातील आपल्या भूमिकेवर भारत पुन्हा विचार करेल असे अनेकांना वाटते. 

सन 1409 मध्ये सिखांपाने जेलग शाळेची स्थापना केली होती, या शाळेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार करण्यात आला. भारत आणि चीनच्या सीमारेषेवरील भागात असून तिला तिबेट नावाने ओळखले जात. याच शाळेतील सर्वात लोकप्रिय विद्यार्थी म्हणजे गेंदुन द्रुप. पुढे जाऊन हेच गेंदुन पहिले दलाई लामा बनले. बौद्ध धर्माचे अनुयायी दलाई लामा यांना रुपकच्या रुपाने पाहतात. मुख्यत्वे दलाई लामा यांना शिक्षक म्हणून पाहिले जाते, लामा या शब्दाचा अर्थच गुरु असा आहे. आपल्या अनुयायांना सरळ मार्गाने चालण्याची शिकवण लामांकडून देण्यात येते. तिबेटी बौद्ध धर्माचे नेते हे जगभरातील सर्वच बौद्धांना मार्गदर्शन करतात. 

सन 1630 सालीच तिबेटच्या एकीकरणा काळापासूनच तिबेटी आणि बौद्ध नेतृत्वात संघर्ष सुरु होता. मान्चु, मंगोल आणि ओइरात या गटांमध्ये सत्तेसाठी लढाई होत होती. अखेर पाचव्या दलाई लामा यांनी पुढाकार घेऊन तिबेटला एकत्र करण्यात यश मिळवले. त्यानंतर, तिबेट सांस्कृतिक रुपाने संपन्न होऊन पुढे आला. त्यासोबतच येथे बौद्ध धर्मही वाढीस लागला. जेलग बौद्धांनी 14 व्या दलाई लामासही मान्यता दिली.

 

साधारण 40 वर्षांनंतर चीनच्या लोकांनी तिबेटवर आक्रमण केले, त्यावेळी 14 वे दलाई लामा तिबेटचे गुरु होते. या लढाईत तिबेटला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर, काही वर्षांनी तिबेटी नागरिकांना चीनविरोधात संघर्ष सुरु केला. तसेच, स्वतंत्र तिबेटची मागणीही करण्यात आली, पण तिबेटला या लढाईत यश मिळाले नाही. त्यावेळी, आपण चीनच्या आक्रमणात आपण अडकल्याची जाणीव दलाई लामा यांना झाली. दरम्यानच्या काळात दलाई लामा यांनी भारताकडे आगेकूच केली. त्यावेळी, 1959 साली दलाई लामा यांच्यासमवेत मोठ्या संख्येने तिबेटी नागरिकही भारतात आले.  

भारताने दलाई लामा यांना शरण दिल्याचे चीनला आवडले नाही, त्यावेळी चीनमध्ये माओत्से संग यांचे सरकार होते. यानंतर चीन व दलाई लामा यांच्यातील तणाव अधिकच वाढत गेला. दलाई लामा यांना जगभरातून सहानुभूती मिळाली, तरी आजही ते निर्वासित म्हणूनच जीवन जगत आहेत. सन 1989 साली दलाई लामा यांना शांतीचा नोबेल देण्यात आला. आता चीनपासून स्वातंत्र्य नको, पण स्वावलंबनाची गरज असल्याचं लामा यांना वाटतं. सन 1950 साली दलाई लामा आणि चीनमध्ये सुरु झालेला वाद आजही कायम आहे. दलाई लामा भारतात राहत असल्यानेच चीनला भारताबद्दल नेहमीच राग आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ... so China is very angry about the 85-year-old Dalai Lama, know Raj 'cause'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.