स्टेजवर परफार्म करताना साप चावून पॉपस्टारचा मृत्यू
By Admin | Updated: April 7, 2016 18:56 IST2016-04-07T18:56:19+5:302016-04-07T18:56:19+5:30
इंडोनेशियातील पॉपस्टार इरमा बुले हिचा स्टेजवर परफार्म करताना सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली.

स्टेजवर परफार्म करताना साप चावून पॉपस्टारचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
जकार्ता, दि. ७ - इंडोनेशियातील पॉपस्टार इरमा बुले हिचा स्टेजवर परफार्म करताना सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली.
येथील स्थानिक वृत्तानुसार, पॉपस्टार इरमा बुले ज्यावेळी परफार्म करत होती. त्यावेळी तिच्यासोबत स्टेजवर साप होते. यातील एका सापाच्या शेपटीवर तिचा पाय पडल्याने त्या सापाने तिच्या पायाचा चावा घेतला. यावेळी तिने त्याकडे दुर्लक्ष करत जवळजवळ ४५ मिनिटे परफार्म सुरुच ठेवला. त्यानंतर ती स्टेजवर कोसळली. या घटनेनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान,ज्या सापावर तिचा पाय पडला, तो साप विषारी नसल्याचे इरमा बुले हिला वाटले असावे, असे येथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. आधीही तिने अनेक सापांसोबत परफार्म केला आहे. तसेच, या भागात अनेक कलाकार हे सापांसोबत परफॉर्म करत असतात.