चीनमध्ये सहा नर्सेससह सात जणांची हत्या
By Admin | Updated: November 21, 2014 03:16 IST2014-11-21T03:16:50+5:302014-11-21T03:16:50+5:30
चीनच्या उत्तरेकडील रुग्णालयाच्या झोपण्याच्या खोलीत सहा परिचारिका (नर्सेस) व रुग्णालयाच्या प्रशासकांसह सात जणांचा गुरुवारी भोसकून खून करण्यात आला

चीनमध्ये सहा नर्सेससह सात जणांची हत्या
बीजिंग : चीनच्या उत्तरेकडील रुग्णालयाच्या झोपण्याच्या खोलीत सहा परिचारिका (नर्सेस) व रुग्णालयाच्या प्रशासकांसह सात जणांचा गुरुवारी भोसकून खून करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांवर गेल्या काही दिवसांत होत असलेल्या हल्ल्यांमध्ये हा भीषण हल्ला ठरला, असे शिन्हुआ या अधिकृत वृत्तसंस्थेने म्हटले. हल्ल्यात एक नर्स गंभीर जखमी झाली.