शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

गणितीय ऑलिंपियाडमध्ये सहा पदकांची कमाई; ऑस्ट्रेलियातील सनशाइन कोस्ट येथे पार पडली स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 09:36 IST

या स्पर्धेत सहभागी झालेल्या ११० देशांमध्ये यंदा भारताने सातवा क्रमांक पटकाविला. मागील सलग तीन वर्षांपासून भारतीय संघाने पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे.

मुंबई : ऑस्ट्रेलियातील सनशाइन कोस्ट येथे नुकत्याच झालेल्या ६६व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाडमध्ये (आयएमओ) भारतीय संघाने दमदार कामगिरी करत तीन सुवर्ण आणि दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली. त्यामध्ये राज्यातील आदित्य मांगुडी याच्यासह दिल्लीच्या कनव तलवार, आरव गुप्ता यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. तर कर्नाटकच्या अबेल मॅथ्यू, दिल्लीचा आदिश जैन यांनी रौप्य आणि दिल्लीच्या अर्चित मानस याने कांस्यपदकाची कमाई केली.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या ११० देशांमध्ये यंदा भारताने सातवा क्रमांक पटकाविला. मागील सलग तीन वर्षांपासून भारतीय संघाने पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे. जगभरातील विविध देशांतील ६३० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात ६९ महिला होत्या. 

गेल्यावर्षी २०२४ मध्ये भारताने ६५ व्या आयएमओमध्ये ४ सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला होता. भारताने १९८९ पासून आतापर्यंत २३ सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यातील ९ पदके ही गेल्या तीन आयएमओमध्ये जिंकली आहेत. तसेच १९९८ नंतर ऑलिम्पियाडमध्ये एकाचवेळी ३ सुवर्णपदके जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. यावर्षी भारतीय संघाने स्पर्धेत २५२ पैकी १९३ गुण मिळवून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. 

होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन हे गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील विविध आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि निवडण्यासाठी नोडल सेंटर आहे.

ऑलिम्पियाडमध्ये चार विषयांवरून प्रश्नगणितीय ऑलिम्पियाडमध्ये चार व्यापक विषयांवरून प्रश्न विचारले जातात. त्यात बीजगणित, संयोजनशास्त्र, संख्या सिद्धांत, भूमिती आणि यजमान देश प्रत्येक सहभागी देशाकडून समस्या प्रस्ताव मागतो. कोणत्याही सहभागी देशाकडून सहा प्रश्न सादर केले जाऊ शकतात.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयEducationशिक्षण