पुढील वर्षी परिस्थिती सामान्य व्हायला हवी- गेटस्
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 05:43 IST2021-03-26T05:42:42+5:302021-03-26T05:43:07+5:30
२०२२ पर्यंत जगातील स्थिती सामान्य व्हायला हवी. बिल ॲण्ड मेलिंडा गेटस फाउंडेशनने कोरोना साथीच्या काळात १.७५ बिलियन डॉलरची मदत दिलेली आहे

पुढील वर्षी परिस्थिती सामान्य व्हायला हवी- गेटस्
वारसॉ : कोरोना लसीमुळे जगातील परिस्थिती २०२२ च्या अखेरपर्यंत पूर्वपदावर यायला हवी, असा विश्वास मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेटस यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ही एक अविश्वसनीय शोकांतिका आहे. तथापि, कोरोना लसीची उपलब्धता ही त्यात दिलासा देणारी बाब आहे.
बिल गेटस म्हणाले की, २०२२ पर्यंत जगातील स्थिती सामान्य व्हायला हवी. बिल ॲण्ड मेलिंडा गेटस फाउंडेशनने कोरोना साथीच्या काळात १.७५ बिलियन डॉलरची मदत दिलेली आहे. लस निर्मिती आदी कार्यासाठी त्यांनी हा निधी दिला होता. जागतिक आरोग्य संघटना आणि ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन ॲण्ड इम्युनाइजेशनने असे लक्ष्य ठेवले आहे की, २०२१ पर्यंत कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी २०० कोटी लसी राखून ठेवणे.