मालीच्या महिलेने दिला एकाचवेळी नवरत्नांना जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 07:00 AM2021-05-06T07:00:12+5:302021-05-06T07:00:57+5:30

माली सरकारने वैद्यकीय उपचार आणि निगराणीसाठी तिला ३० मार्च रोजी मोरोक्कोला पाठवले.

Simultaneous birth of Navratna by a Mali woman | मालीच्या महिलेने दिला एकाचवेळी नवरत्नांना जन्म

मालीच्या महिलेने दिला एकाचवेळी नवरत्नांना जन्म

googlenewsNext

बामको (माली) :  दक्षिण आफ्रिकेतील एका महिलेने एकाचवेळी नवरत्नांना जन्म दिला. जगातील ही अत्यंत दुर्मीळ घटना होय.  एकाचवेळी सहा बाळांना जन्म देण्याची घटना दुर्मीळ मानली जायची; हलिमा सिसाने एकाचवेळी पाच कन्या आणि चार पुत्ररत्नांना जन्म देण्याची घटना अद्‌भूतच म्हणावी लागेल.
गर्भवती असताना हलिमा सिसाची मोरोक्को आणि मालीमध्ये  अल्ट्रासाऊंड यंत्राने तपासणी केली असता, ती सात बाळांना जन्म देईल, असे अपेक्षित होते.

माली सरकारने वैद्यकीय उपचार आणि निगराणीसाठी तिला ३० मार्च रोजी मोरोक्कोला पाठवले. मंगळवारी शस्त्रक्रियेद्वारे (सिजेरियन) तिची प्रसुती करण्यात आली असता, तिने नऊ बाळांना जन्म दिला. नऊ बाळांसह तिची प्रकृती ठीक आहे. डॉक्टर हलिमा आणि तिच्या बाळांच्या प्रकृतीविषयी चिंतीत आहेत. वैद्यकीय गुंतागुंत आणि एकाचवेळी नऊ बाळांना जन्म देणे म्हणजे काही बाळांची पूर्ण वाढ झाली नसावी, म्हणून डॉक्टर चिंतीत आहेत.

पाच कन्या, चार पुत्र
nमालीतील एका इस्पितळात एका महिलेने एकाचवेळी नऊ बाळांना जन्म दिल्याची अत्यंत दुर्मीळ घटना घडल्याची माहिती नसल्याचे मोरोक्कोच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते रशिद कौधारी यांनी सांगितले. तथापि, आरोग्य मंत्रालयाने हलिमा सिसाने पाच कन्या आणि चार पुत्रांना जन्म दिल्याचे निवदेनात म्हटले आहे.
nबाळांसह आईची प्रकृती ठीक आहे, असे आरोग्यमंत्री फान्टा सिबी यांनी म्हटले आहे. प्रसुतीवेळी हलिमासोबत असलेले डॉक्टर मला सातत्याने माहिती देत होते, असे त्यांनी म्हटले आहे. हलिमाची यशस्वी प्रसुती केल्याबद्दल सिबे यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Simultaneous birth of Navratna by a Mali woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.