वॉश्गिंटन - व्हेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला करून तेथील राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली आहे. अमेरिकेच्या या कारवाईमुळे जगभरात खळबळ माजली आहे. व्हेनेझुएलानंतर आता पुढचे लक्ष ग्रीनलँड असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. मात्र त्यावर युरोपातील ७ देशांनी पुढाकार घेत ग्रीनलँडवरील ट्रम्प यांच्या घोषणेचा निषेध केला. त्यातच आता गुरुवारी अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना ट्रॅव्हल एडवाइजरी जारी केली आहे. त्यात २१ देशांमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला अमेरिकन नागरिकांना देण्यात आला आहे.
अमेरिकेने जारी केलेल्या या देशांच्या यादीत रशिया, युक्रेन, लीबिया, बुर्किना फासो यासारख्या देशांचा समावेश आहे. मात्र या यादीत भारत पाकिस्तानचा उल्लेख नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र दूतावास व्यवहार विभागाने गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये ट्रॅव्हल एडवाइजरी जारी केली. त्यात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, आम्ही लेव्हल १ ते ४ सह अमेरिकन नागरिकांसाठी प्रवासासाठी मार्गदर्शक सूचना जारी करत आहोत. लेव्हल ४ म्हणजे तिथे प्रवास करू नका असं म्हटलं आहे.
आम्ही स्थानिक परिस्थिती आणि या देशांमधील अमेरिकन नागरिकांना मदत पुरवण्याच्या आमच्या मर्यादित क्षमतेनुसार लेव्हल ४ दिला आहे. ही ठिकाणे धोकादायक आहेत. कोणत्याही कारणास्तव तेथे प्रवास करणे टाळा असं अमेरिकेने नागरिकांना म्हटलं.
'या' २१ देशांमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला
अफगाणिस्तानबेलारूसबुर्किना फासोबर्मामध्य आफ्रिकन प्रजासत्ताक (CAR)हैतीइराणइराकलेबनॉनलिबियामालीनायजरउत्तर कोरियारशियासोमालियादक्षिण सुदानसुदानसीरियायुक्रेनव्हेनेझुएलायेमेन
रशियन नेत्याच्या अणुहल्ल्याच्या धमकीनंतर ट्रम्प प्रशासनानं उचललं पाऊल
रशियाच्या अणुहल्ल्याच्या धमकीनंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. अमेरिकन सैन्याने अटलांटिक महासागरात रशियन ध्वज असलेला तेल टँकर मरीनेरा ताब्यात घेतला. ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला. रशियाने अमेरिकेच्या या कृतीला चाचेगिरी म्हटले. या प्रकारानंतर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या पक्षाचे सदस्य आणि संरक्षण राज्य समितीचे उपाध्यक्ष अलेक्सी झुरावलेव्ह यांनी अमेरिकेला अणुहल्ल्यांची धमकी दिली.
Web Summary : Amid global tensions, the US advises citizens against traveling to 21 countries, including Russia and Ukraine, citing dangerous conditions and limited assistance capabilities. No travel to these level 4 countries.
Web Summary : वैश्विक तनाव के बीच, अमेरिका ने रूस और यूक्रेन सहित 21 देशों की यात्रा न करने की सलाह दी, खतरनाक स्थितियों और सीमित सहायता क्षमताओं का हवाला दिया। इन लेवल 4 देशों में यात्रा नहीं।