शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

झिया यांच्या कार्यालयास वेढा

By admin | Updated: January 5, 2015 03:55 IST

बांगलादेशात विरोधकांनी बहिष्कार घातलेल्या गतवर्षीच्या वादग्रस्त निवडणुकीचा पहिला वर्धापन दिन सोमवारी साजरा होत

ढाका : बांगलादेशात विरोधकांनी बहिष्कार घातलेल्या गतवर्षीच्या वादग्रस्त निवडणुकीचा पहिला वर्धापन दिन सोमवारी साजरा होत असून पोलिसांनी विरोधी पक्ष नेत्या बेगम झिया यांच्या कार्यालयाला वेढा घातला आहे, त्यांच्या निषेध मोर्चांनाही बंदी घातली आहे. अवामी लीग या सत्ताधारी पक्षाच्या नेत्या व पंतप्रधान शेख हसीना यांनी या वर्धापन दिनानमित्त सोहळ्याचे आयोजन केले आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या विरोधी पक्षाच्या प्रमुख असणाऱ्या बेगम खलिदा झिया यांनी गेल्या निवडणुकीला फार्स म्हणत त्यावर बहिष्कार टाकला होता. शनिवारपासून त्यांना गुलशन आॅफिस या त्यांच्या कार्यालयात बंदी करण्यात आले. या इमारतीभोवती पोलिसांचा वेढा असून, त्यात महिला पोलीसही आहेत. झिया यांना पोलिसांनी कार्यालयाबाहेर पडण्यास बंदी घातली असून, त्यांच्या इच्छेविरोधात त्यांना कार्यालयात बंदी केले आहे, असे झिया (६९) यांच्या विशेष सहायक शिमुल बिस्वास यांनी पत्रकारांना सांगितले. पण पोलिस प्रवक्ता मोनीरुल इस्लाम यांनी हे वृत्त फेटाळले असून झिया यांना कोणत्याही प्रकारे बंद केलेले नाही, त्यांची सुरक्षा वाढविली आहे एवढेच असे म्हटले आहे. शनिवारी रात्रीही त्या घरी जाऊ शकल्या असत्या असे त्यानी सांगितले.पंतप्रधान शेख हसीना यांनी निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप झिया यांनी केला होता. सोमवारी लोकशाही सरकारचा पहिला वर्धापन दिन असल्याने त्यादिवशी लोकशाहीची हत्या झालेला दिवस पाळण्याची घोषणा झिया यांनी केली होती.त्यासाठी देशभर मोर्चे व सभा आयोजित केल्या होत्या . पोलिसांनी आज राजधानी ढाका शहरात सर्व सभा व मोर्चावर बंदी घातली आहे, कायदा व सुरक्षा राखण्यासाठी रविवारी सायंकाळी ५ वाजेपासून पुढील आदेश येईपर्यंंत ही बंदी आहे. पण सत्ताधारी अवामी लीग पक्षातर्फे वर्धापनदिनानिमित्त सभा आयोजित करण्यात आली आहे. झिया यांच्या कार्यालयाबाहेर वाळू भरलेले ट्रक रस्त्यावर उभे करण्यात आले असून, या इमारतीबाहेर कोणीही पडू नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. झिया पत्रकारांसमोर आल्या नाहीत; पण कार्यालयात अनेक महिला नेत्या आहेत. (वृत्तसंस्था)