शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इक्वेडोरमध्ये कैद्यांचा गोळीबार; बॉम्बहल्ल्यात 52 जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 09:34 IST

तुरुंगात दोन गट भिडले; १० जण जखमी; शस्त्रे, स्फोटके जप्त

ठळक मुद्देगोळीबार व बॉम्बहल्ल्यात मरण पावलेल्या कैद्यांचे तुरुंगात पडलेले मृतदेह दाखविणाऱ्या व्हिडीओ फिती समाजमाध्यमांवर झळकल्या आहेत. 

क्विटो :  इक्वेडोर या देशातील सर्वात मोठ्या लिटोरल तुरुंगामध्ये कैद्यांच्या दोन गटांनी शनिवारी परस्परांवर केलेला गोळीबार व बॉम्बहल्ल्यांत ५२ जण ठार झाले, तर १० जण जखमी झाले आहेत. या तुरुंगाजवळील गुयाक्विल शहरातल्या रहिवाशांमध्ये या रक्तपातामुळे घबराट निर्माण झाली.  तुरुंगातील रक्षक हिंसाचार रोखण्यास कमी पडू लागल्याने पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली व हिंसाचार रोखण्यात आला. अनेक कैद्यांकडून शस्त्रे, बॉम्ब, अन्य स्फोटके जप्त करण्यात आली.

गोळीबार व बॉम्बहल्ल्यात मरण पावलेल्या कैद्यांचे तुरुंगात पडलेले मृतदेह दाखविणाऱ्या व्हिडीओ फिती समाजमाध्यमांवर झळकल्या आहेत. अमली पदार्थांचे तस्कर व संघटित गुन्हेगार यांच्याशी सुरक्षा दलांना अधिक मजबुतीने लढा देता यावा यासाठी या देशात राष्ट्राध्यक्ष गिलेर्मो लासो यांनी ऑक्टोबर महिन्यापासून आणीबाणी पुकारली आहे. नेमके त्याच काळात लिटोरल येथील तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये हा मोठा हिंसाचार झाला.  इक्वेडोरमधील तुरुंगांमध्ये अमली पदार्थांचे अनेक तस्कर शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या टोळ्यांमध्ये तुरुंगातही संघर्ष सुरू असतो. गेल्या सप्टेंबर महिन्यात लिटोरल तुरुंगामध्ये झालेल्या हिंसाचारात ११८ जण ठार व ७९ जण जखमी झाले होते. त्यावेळी मृतांमधील पाच जणांचा शिरच्छेद करण्यात आला होता. एका कैद्याचा भाऊ फ्रान्सिस्का चॅनके यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेला हिंसाचार पाहून हे तुरुंग आहेत की कत्तलखाने असा प्रश्न सर्वांना पडला आहे. इक्वेडोरमधील तुरुंगांच्या सुरक्षेची जबाबदारी आता लष्कराकडे द्यावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे.

तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदीइक्वेडोरमधील सर्व तुरुंगांमध्ये ४० हजार कैदी आहेत. त्यातील ८,५०० कैदी हे एकट्या लिटोरल तुरुंगामध्ये आहेत. या तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा ५५ टक्के अधिक कैदी ठेवण्यात आले आहेत. तर लिटोरल तुरुंगात ६२ टक्के अधिक कैदी आहेत.  

गेल्या सप्टेंबर महिन्यात लिटोरल तुरुंगामध्ये झालेल्या हिंसाचारात

टॅग्स :Deathमृत्यूBombsस्फोटके