इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:06 IST2026-04-06T12:06:04+5:302026-04-06T12:06:42+5:30

United State News: सध्या इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धामुळे अमेरिकेमध्येही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचदरम्यान, अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमधील अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसपासून जवळच रविवारी गोळीबाराची घटना घडली.

Shooting near the White House during the war against Iran, Trump was also present nearby | इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित

इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित

सध्या इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धामुळे अमेरिकेमध्येही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचदरम्यान, अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमधील अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसपासून जवळच रविवारी गोळीबाराची घटना घडली. या घटनेमुळे सुरक्षा दलांमध्ये खळबळ उडाली आहे.

गोळीबाराची ही घटना व्हाईट हाऊसच्या समोर असलेल्या लाफायेट पार्क जवळ घडली. या गोळीबारात कुणीही जखमी झालेलं नाही. तसेच गोळीबार करणारा व्यक्ती अद्याप फरार आहे. याबाबत सिक्रेट सर्व्हिसने सांगितले की, पोलीस आणि इतर संस्था मिळून संशयित व्यक्ती आणि वाहनांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. तसेच व्हाईट हाऊस जवळली सुरक्षा व्यवस्था अधिकाधिक कडक करण्यात आली आहे. दरम्यान, गोळीबाराची ही घटना घडली तेव्हा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्येच उपस्थित होते.

दरम्यान, अमेरिकेसाठी वॉशिंग्टनमधील अतिसंवेदनशील भागाची सुरक्षा चिंतेची बाब ठरली आहे. काही दिवसांपूर्वी फ्लोरिडामध्ये एक संशयास्पद विमान दिसल्याने एफ-१६ विमानाला अलर्टवर पाठवण्यात आले.  

Web Title: Shooting near the White House during the war against Iran, Trump was also present nearby