अमेरिका पुन्हा हादरली! कॅलिफोर्नियाच्या बारमध्ये अंदाधुंद गोळीबार; 5 जणांचा मृत्यू, 6 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 10:56 IST2023-08-24T10:55:49+5:302023-08-24T10:56:42+5:30
बारमध्ये झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

फोटो - AFP
अमेरिकेत सातत्याने गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. कॅलिफोर्नियामध्ये अशीच एक भयंकर घटना घडली आहे. बुधवारी बारमध्ये झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांमध्ये हल्लेखोराचाही समावेश असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. गोळीबाराची घटना बारमध्ये घडली जिथे एका सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने अचानक गोळीबार केला. ऑरेंज काउंटी शेरीफने ट्विटरवर एका पोस्टमध्ये सांगितलं की, गोळीबारानंतर आणखी सहा लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.