अमेरिका आणि इराणमधील संघर्षाने आता एक अत्यंत भयानक वळण घेतले आहे. इराणची शक्ती मानली जाणारी युद्धनौका 'IRIS Dena' वर अमेरिकेने हल्ला करण्यापूर्वीच तिथे मृत्यूचे सावट पसरले होते, असा खळबळजनक दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. युद्धाच्या इतिहासात विरळच पाहायला मिळणारे हे दृश्य नेमके काय होते, याबाबत आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अमेरिकेच्या नौदलाने IRIS Dena या इराणी युद्धनौकेवर टॉर्पिडो डागण्यापूर्वीच, त्या जहाजावरील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकन ड्रोननी टिपलेल्या फोटोंमध्ये युद्धनौकेच्या डेकवर नौसैनिक दिसत होते तिथे मोठ्या प्रमाणावर अफरातफर दिसत होती. म्हणजेच, अमेरिकेचा मुख्य हल्ला होण्यापूर्वीच जहाजावर काहीतरी भयंकर घडले होते. अमेरिकेने ही युद्धनौका रिकामी करण्याचे दोनवेळा इशारा दिला होता.
इराणच्या या युद्धनौकेवरून इराणमध्ये स्वकीयांना एका नौसैनिकाने फोन केला होता. यामध्ये त्याने अमेरिका आपल्या युद्धनौकेवर हल्ला करणार असल्याचे सांगितले होते. जेव्हा ही गोष्ट नौसैनिकांना समजली तेव्हा त्यांनी जीव वाचविण्यासाठी डेक गाठला व समुद्रात उडी मारण्यासाठी प्रयत्न केले. परंतू, या नौसैनिकांना तसे करण्यापासून युद्धनौकेवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोखले होते, असे या नौसैनिकाने फोनवर कुटुंबाला सांगितले होते. या हल्ल्यात या नौसैनिकाचा देखील मृत्यू झाला आहे. इराणच्या या युद्धनौकेवर शस्त्रास्त्रे नव्हती. यामुळे ही युद्धनौका लढण्याच्या स्थितीत नव्हती. यामुळे जीव वाचविण्याचाच या नौसैनिकांसमोर एकमेव पर्याय उरला होता.
जर या नौसैनिकांना उडी मारण्यासाठी परवानगी दिली असती तर अनेकांचा जीव वाचला असता. जे वाचले त्यांनी आपल्या वरिष्ठांचे आदेश मानले नाहीत व हल्ला होण्यापूर्वी समुद्रात उड्या घेतल्या किंवा लाईफ बोटचा वापर केला, असा दावा इराण इंटरनॅशनलच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. श्रीलंकेचे नौदल जेव्हा मदतीसाठी तिथे पोहोचले तेव्हा युद्धनौकेचे भाग दिसतही नव्हते. केवळ ३०-३५ नौसैनिक तरंगताना दिसत होते. या युद्धनौकेवर १८० नौसैनिक तैनात होते. यापैकी ८७ जणांचे मृतदेह सापडले आहेत.
Web Summary : Before the US attack on IRIS Dena, chaos reigned. Sailors allegedly tried to escape, but were stopped. Many died in the attack; survivors defied orders. Eighty-seven bodies were recovered.
Web Summary : अमेरिकी हमले से पहले आईआरआईएस डेना में अराजकता थी। नाविकों ने भागने की कोशिश की, लेकिन उन्हें रोका गया। हमले में कई लोगों की मौत हो गई; बचे लोगों ने आदेशों की अवहेलना की। सत्तासी शव बरामद किए गए।