कोविड सेंटरमध्ये अश्लील चाळे, ड्रग्सचं सेवन आणि सेक्स केल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 17:41 IST2021-08-30T17:27:33+5:302021-08-30T17:41:02+5:30
Covid cener Bangkok:ही कामे थांबवण्यासाठी आता अधिकाऱ्यांमार्फत कोविड रुग्णालयांमध्ये छापे टाकले जात आहेत.

कोविड सेंटरमध्ये अश्लील चाळे, ड्रग्सचं सेवन आणि सेक्स केल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर
बँकॉक: कोरोनाव्हायरस आजारानं ग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याऐवजी आता कोविड सेंटरमध्ये इतर गोष्टी घडताना दिसत आहेत. प्रकरण थायलंडमधील कोरोना रुग्णालयातील आहे. रुग्णालयातच काही रुग्णांनी ड्रग्सचं सेवन आणि ग्रुप सेक्स केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
द नेशन थायलंडच्या अहवालानुसार, रुग्णालयातील या प्रकाराने अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. कोरोना रुग्णांची ही कामे थांबवण्यासाठी आता अधिकाऱ्यांमार्फत कोविड रुग्णालयांमध्ये छापे टाकले जात आहेत. अलीकडेच, थायलंडच्या अंतर्गत सुरक्षा ऑपरेशन कमांडच्या अधिकाऱ्यांनी पीपीई किट घालून अनेक केंद्रांवर छापे मारले. या दरम्यान, केंद्रात उपस्थित सुमारे 1000 रुग्णांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांना अनेक रुग्णांकडून सिगारेट आणि हुक्का मोठ्या प्रमाणात सापडला. टीमनं हॉस्पिटलचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले, ज्यात पुरुष-महिला रुग्ण एकमेकांच्या वॉर्डात जाताना दिसत होते.
अश्लील चाळे सुरू
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे थायलंडमध्ये अनेक आपत्कालीन केंद्रं बांधली गेली. त्यावेळी येथे रुग्णांवर उपचार केले जात होते. परंतु कोरोनाची प्रकरणे कमी होताच या केंद्रांमधून उपचाराऐवजी अश्लील प्रकरणं समोर येत आहेत. सर्वाधिक तक्रारी बँकॉकमधील डॉन मुआंग विमानतळाच्या गोदामात बांधलेल्या 1800 खाटांच्या हॉस्पिटलमधून येत आहेत.