धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 21:51 IST2025-08-09T21:50:25+5:302025-08-09T21:51:31+5:30

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प हे कुठलाही निर्णय हा आर्थिक नफा नुकसान पाहूनच घेतात, असे म्हटले जाते. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची पत्नी इवाना ट्रम्प यांच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह फायद्याचा विचार करून गोल्फ कोर्समध्येच पुरल्याचा दावा केला जात आहे.

Shocking! Donald Trump buried his first wife on a golf course for profit? It is being claimed | धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सध्या विविध देशांवर लावत असलेल्या टॅरिफमुळे चर्चेत आहेत. ट्रम्प हे चतुर राजकारण्यासोबतच एक यशस्वी उद्योजगकही आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे कुठलाही निर्णय हा आर्थिक नफा नुकसान पाहूनच घेतात, असे म्हटले जाते. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची पत्नी इवाना ट्रम्प यांच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह फायद्याचा विचार करून गोल्फ कोर्समध्येच पुरल्याचा दावा केला जात आहे. जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा त्याची खूप चर्चा झाली होती. तर आता ट्रम्प यांनी टॅरिफवरून दादागिरी सुरू केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

२०२२ साली जुलै महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इवाना ट्रम्प यांचं निधन झालं होतं. त्यानंतर ट्रम्प यांची माजी पत्नी असलेल्या इवाना हिच्या मृतदेहावर न्यूजर्सीमधील गोल्फकोर्समध्ये अंत्यसंस्कार करून पुरण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी इवाना ट्रम्प यांचा मृतदेह फायद्याचा विचार करून गोल्फ कोर्समध्ये पुरल्याचा दावा केला जात आहे. तसेच करापासून वाचण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पाऊल उचलल्याचा दावा करत आहेत. काही लोकांकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नीच्या कबरीचा फोटो शेअर करण्यात येत आहे. या कबरीवर कुठलीही फुले वगैरे वाहिलेली दिसत नाही आहेत. न्यू जर्सीमधील कायद्यानुसार एक कबर असली तरी ती जमीन कायदेशीररीत्या दफनभूमीमध्ये परीवर्तीत होऊ शकते. तसेच जमिनीचा हा तुकडा मालमत्ता कर, विक्री कर आणि प्राप्तिकर अशा करांपासून सवलत मिळवण्यास पात्र ठरतो. म्हणजेच त्या जमिनीवर कुठलाही  कर लागत नाही.

याच कायद्याचा फायदा घेत डोनाल्ड ट्रम्प यांनी या जमिनीला नॉन प्रॉफिटेबल कब्रस्थान म्हणून नोंदवलं आहे. त्यामुळे संपूर्ण गोल्फ कोर्स टॅक्स फ्री झाला आहे.  त्याबरोबरच एका रिपोर्टनुसार कब्रस्थान कंपन्यांना आपल्याकडील जमिनीवर विविध प्रकराच्या करांमध्ये सूट मिळते. याचा अर्थ डोनाल्ड ट्रम्प यांचा हेतू गोल्फ कोर्सला कबरीच्या रूपात वापरून त्या जमिनीला करमुक्त करून घेण्याचा होता.

गोल्फ कोर्सवर गोल्फ खेळलं जातं. या मैदानाचा विस्तार प्रचंड असतो. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इवाना ट्रम्प यांना या मैदानाच्या एका कोपऱ्यात पुरून संपूर्ण मैदानाला कब्रस्थान असं दाखूवन गोल्फ कोर्स करमुक्त करून घेतलं आहे. तसेच पत्नीच्या अंत्यसंस्कारामधूनही ट्रम्प यांनी फायदा पाहिला, असं बोललं जात आहे. 

Web Title: Shocking! Donald Trump buried his first wife on a golf course for profit? It is being claimed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.